वृत्तसंस्था/ पुणे
अनुपमा उपाध्याय व मिथुन मंजुनाथ यांनी येथे झालेल्या वरिष्ठांच्या राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत महिला व पुरुष एकेरीचे जेतेपद पटकावले.

18 वर्षीय अनुपमाने अंतिम लढती आकर्षी कश्यपवर 20-22, 21-17, 24-22 अशा अटीतटीच्या झुंजीत विजय मिळविला. एक तास 18 मिनिटे ही झुंज रंगली होती. पुरुष एकेरीच्या अंतिम लढतीत मिथुनने पूर्ण वर्चस्व राखत प्रियांशू राजावतचा 21-16, 21-11 असा पराभव करून जेतेपद पटकावले. केवळ 38 मिनिटांत त्याने हा सामना संपवला. महिलांच्या दुहेरीत ट्रीजा जॉली व गायत्री गोपीचंद यांनी तर मिश्र दुहेरीत टी. हेमनागेंद्र बाबू व कनिका कन्वल यांनी जेतेपद पटकावले. पुरुष दुहेरीमध्ये एस. कुशल राज व एस. प्रकाश राज यांनी अजिंक्यपद मिळविले.









