वृत्तसंस्था / ब्रुसेल्स
शुक्रवारी येथे झालेल्या डायमंड लीग अॅथलेटिक्स स्पर्धेत भारताची महिला भालाफेकधारक अनु राणीने निराशा केली. या क्रीडा प्रकारात तिने 57.54 मि. भालाफेक करत सातवे स्थान मिळविले. या क्रीडाप्रकारात अनु राणीने चालूवर्षीच्या अॅथलेटिक्स हंगामात नवा राष्ट्रीय विक्रम करताना फेडरेशन चषक अॅथलेटिक्स स्पर्धेत 59.24 मीटरचा भालाफेक केली होती. 2022 च्या बर्मिंगहॅम राष्ट्रकूल स्पर्धेत अनु राणीने या क्रीडाप्रकारात भारताला कास्यपदक मिळवून दिले होते. तसेच ऑगस्टमध्ये झालेल्या विश्व अॅथलेटिक्स चॅम्पियनशीप स्पर्धेत तिला अंतिम फेरी गाठता आली नव्हती.









