वार्ताहर राजापूर
बारसू-सोलगाव रिफायनरी विरोधी संघटनेचे अध्यक्ष अमोल बोळे यांच्यासह अन्य आंदोलकांवर घातलेली तालुकाबंदी हटविल्यानंतर लगेचच शुकवारी आंदोलनात सहभागी होण्यासाठी गेलेल्या अमोल बोळे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
राजापूर तालुक्यातील बारसू परिसरात पस्तावित असलेल्या रिफायनरी पकल्पासाठी सुरू असलेल्या माती परीक्षण कामाला होणार विरोध लक्षात घेवून शासनाने दि.22 एपिल पासून या परिसरात मनाई आदेश जारी केले आहेत. तर काही आंदोलकांना गावात प्रवेश करण्यास मनाई आदेश बजावण्यात आले होते. त्यानंतर पत्यक्ष माती परिक्षणाचे काम सुरू करताना आंदोलनाचे नेतृत्व करणारे सत्यजित चव्हाण तसेच मुंबई संघटनेचे अध्यक्ष व अन्य काही आंदोलकांना अटकही केली होती.
दरम्यान या गावबंदीच्या आदेशाविरोधात बारसू-सोलगाव रिफायनरी विरोधी संघटनेचे अध्यक्ष अमोल बोळे यांच्यासह अन्य आठ आंदोलकांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर उत्तर देताना राज्य सरकारने सरकारकडून प्रतिबंधात्मक आदेश मागे घेण्यात आल्याची माहिती दिली. सर्व प्रतिबंधात्मक आदेश मागे घेत असल्याचे राज्य सरकारनं कबूल करताच हायकोर्टाने याचिका निकाली काढली. गावबंदीचे आदेश मागे घेतल्याने शुकवारपासून पुन्हा सुरू झालेल्या आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी जाणारे बारसू-सोलगाव रिफायनरी विरोधी संघटनेचे अध्यक्ष अमोल बोळे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.









