215 किलो प्लास्टिक जप्त : 44 हजार 700 रुपयांचा दंड वसूल
बेळगाव : प्लास्टिकविरोधात महापालिकेने जोरदार मोहीम उघडली आहे. बुधवारी विविध ठिकाणी तपासणी करून 215 किलो प्लास्टिक जप्त करून 44 हजार 700 रुपये दंड आकारण्यात आल्याची माहिती मनपा आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी दिली आहे. प्लास्टिकवर निर्बंध घालण्याबाबत केंद्र सरकारनेच आदेश दिले आहेत. प्लास्टिक कचरा व्यवस्थापन नियम 2016 आणि दुरुस्ती नियम 2022 नुसार पर्यावरणाच्या संरक्षणासाठी हे पाऊल उचलण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. पर्यावरणाचा ऱ्हास प्लास्टिकमुळेच अधिक प्रमाणात होत असतो. त्यामुळे प्लास्टिकला निर्बंध घालण्याचे आदेश केंद्र सरकारकडून आले आहेत. त्यामुळे ही कारवाई महापालिकेच्यावतीने करण्यात येत आहे. शहरामध्ये बुधवारी विविध दुकानांमध्ये तपासणी करून 215 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले आहे. याचबरोबर 44 हजार 700 रुपये दंडदेखील वसूल करण्यात आला आहे. त्यामुळे व्यापारीवर्गातून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. आरोग्य निरीक्षक कलावती आडमनी, सुभाष गराणी, किरण देमट्टी व इतरांनी ही कारवाई केली.









