गोळीबार करून हल्लेखोर पसार
वृत्तसंस्था/ इस्लामाबाद
पाकिस्तानमध्ये टप्प्याटप्प्याने कुख्यात भारतविरोधी दहशतवादी मारले जात आहेत. दहशतवाद्यांची अज्ञात बंदूकधाऱ्यांकडून हत्या केली जात असून त्यांचा शोध पाकिस्तानी पोलिसांना आजतागायत लावता आलेला नाही. नुकताच अज्ञात बंदूकधाऱ्यांनी लष्कर-ए-तोयबा (एलईटी) म्होरक्मया हाफिज सईदचा जवळचा समजला जाणारा दहशतवादी अबू कासिम याचाही खात्मा करण्यात आला आहे. अबू कासिमची पाकव्याप्त काश्मीर (पीओके) येथील रावळकोट येथील मशिदीमध्ये गोळ्या घालून हत्या करण्यात आली. या हल्ल्यामुळे पाकिस्तानमध्ये कार्यरत असलेल्या दहशतवादी संघटनांकडून वाढत्या अंतर्गत सुरक्षा आव्हानांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
भारतातील अनेक दहशतवादी हल्ल्यांमागे अबू कासिमचा सहभाग उघड झालेला आहे. जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय सुरक्षा दलांवर झालेल्या अनेक हायप्रोफाईल हल्ल्यांमध्येही त्याचा प्रत्यक्ष सहभाग होता. एवढेच नाही तर तो पीओकेमधील लष्कर-ए-तोयबाच्या दहशतवाद्यांना लाँच पॅडद्वारे जम्मू-काश्मीरमध्ये घुसवत असल्याचेही स्पष्ट झाले होते. सदर घुसखोरांसाठी वास्तव्य, जेवण आणि आर्थिक पाठबळ पुरविण्याचे कामही अबू कासिम करत असे. तसेच स्थानिक तऊणांना लष्करात भरती करण्यातही कासिमचा सहभाग होता. भारतीय सुरक्षा यंत्रणा अनेक दिवसांपासून अबू कासिमचा शोध घेत होत्या.
लष्कर-ए-तोयबाचा संस्थापक आणि जमात-उद-दावाचा प्रमुख हाफिज सईदचा मारला गेलेला दहशतवादी अबू कासिम हा अत्यंत विश्वासू मानत होता. दोघांमधील घनिष्ठ संबंधांमुळे पाकिस्तानमध्ये दहशतवाद्यांच्या भरतीला वेग आला होता. हाफिज सईदने अनेकदा जम्मू-काश्मीरमधील प्रत्येक दहशतवादी हल्ल्याचे नियोजन अबू कासिमकडे सोपवले हेते.
पाकिस्तानमध्ये एकामागून एक दहशतवाद्यांचा खात्मा केला जात आहे. गेल्या महिन्यात 12 ऑगस्ट रोजी हाफिज सईदचा आणखी एक जवळचा सहकारी खालिद सैफुल्ला याला अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या घातल्या होत्या. त्यापूर्वी 30 मे रोजी लष्कराचा टॉप कमांडर अब्दुल सलाम भुट्टावीच्या मृत्यूची बातमी आली होती. भुट्टावीने 2008 मध्ये मुंबईवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिले होते. तो बराच काळ पाकिस्तानच्या तुऊंगात दहशतवादी वित्तपुरवठा प्रकरणात शिक्षा भोगत होता.









