लंडन येथील वेस्टमिंस्टर विद्यापीठातील प्राध्यापिका डॉ. निताशा कौल या राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंधांचे धडे देत असतात. मूळच्या काश्मिरी पंडित अन् ब्रिटिश नागरिक डॉ. कौल यांनी अलिकडेच सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर भारत सरकारकडून पाठविण्यात आलेल्या अधिकृत पत्राला शेअर केले आहे. या पत्राद्वारे कौल यांचे ओव्हरसीज सिटिजनशिप ऑफ इंडिया रद्द करण्यात आल्याचे कळविण्यात आले आहे. यात कौल यांना भारतविरोधी कारवाया आणि दुर्भावनेने युक्त भाषणांसाठी जबाबदार ठरविण्यात आले आहे.
यापूर्वी कौल यांना फेब्रुवारी महिन्यात बेंगळूर येथील एका परिषदेत भाग घेण्यापासून रोखण्यात आले होते. यानंतर त्यांनी भारताबाहेरील शिक्षणतज्ञांना देश आणि परिवारापर्यंत पोहोचण्यापासून रोखणे, भारतातील अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या उल्लंघनाशी संबंधित असल्याचा दावा त्यांनी केला होता.
भारत सरकारनुसार ओसीआय रद्द करण्याचा अधिकार त्याला घटनेच्या अनुच्छेद 7 ब आणि ओसीआय कायदा 2005 च्या अंतर्गत प्राप्त आहे. याच्या अंतर्गत जर कुठलीही व्यक्ती भारताची घटना, सार्वभौमत्व किंवा सुरक्षेच्या विरोधात कार्य करत असेल किंवा वक्तव्य करत असेल तर त्याचे ओसीआय कार्ड रद्द केले जाऊ शकते.
याप्रकरणी लंडनमधील भारतीय उच्चायोगाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न कौल यांनी केला होता. भारत सरकारनुसार डॉ. कौल यांच्या टिप्पणी देशाची प्रतिमा आणि सार्वभौमत्वाला नुकसान पोहोचवित आहेत. आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर कौल काश्मीर, लोकशाही आणि मानवाधिकारांबद्दल भारताच्या विरोधात दुष्प्रचार करत असतात.
डॉ. कौल प्रकरणी सरकारने दिलेली कारणे…
आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर भारतविरोधी वक्तव्यं
सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर भारताकरता शत्रुत्वपूर्ण सामग्री
भारताच्या घटनात्मक संस्थांवर टीका









