वेंगुर्ले /वार्ताहर-
वेंगुर्ले पोलिस स्टेशनमार्फत पोलिस निरिक्षक अतुल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात अंमली पदार्थ जनजागृती मोहिम राबविण्यात आली. यावेळी स्वतः पोलिस निरीक्षक अतुल जाधव यांनी या मोहिमेबाबत मार्गदर्शन केले. वेंगुर्ले एस.टी. स्टँड येथे पोलीस निरीक्षक अतुल जाधव, वाहतूक पोलिस मनोज परुळेकर, महिला पोलिस संतोषी सावंत यांनी या मोहिमेबाबत प्रवासी, विद्यार्थी व नागरिक यांना तसेच येथील रिक्षा स्टँड येथेही मार्गदर्शन केले. अंमली पदार्थाच्या सेवनाने जीवन उध्वस्त होत आहे. मुलांनी तसेच इतरांनीही त्यापासून दूर रहावे. अंमली पदार्थ सेवनाचे दुष्परीणाम पाहता त्याऐवजी योगासनांचा आधार घ्यावा, असे आवाहन पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांनी केले. यावेळी महिला पोलिस रंजिता चौहान, प्रज्ञा मराठे, मनोज परुळेकर, संतोषी सावंत आदी सहभागी झाले होते.