4 देशांच्या वैज्ञानिकांच्या आवाजावर झाले अध्ययन
अंटार्क्टिकाच्या वैज्ञानिकांदरम्यान होणाऱ्या संपर्कातून एका नव्या भाषाशैलीचा शोध लागला आहे. तेथे राहणारे संशोधक आणि वैज्ञानिक इंग्रजी, हिंदी, प्रेच आणि जगातील सुमारे 7,100 भाषांच्या व्यतिरिक्त एका नव्या एक्सेंटमध्ये संभाषण करतात, याला ‘अंटार्क्टिका एक्सेंट’ म्हटले जात आहे. अंटार्क्टिकात सुमारे 4 हजार लोक राहतात, येथील तापमान उणे 98 अंश सेल्सिअसपर्यंत खालावत असल्याने काही काळासाठी येथे केवळ एक हजार लोकच राहतात. सर्व जण अंटार्क्टिकाचे नागरिक नसतात, तर विविध देशांचे संशोधक आणि वैज्ञानिक असतात.

नव्या एक्सेंटचा शोध लावण्यासाठी या 1 हजार संशोधकांपैकी 11 जणांचा आवाज रिकॉर्ड करण्यात आला. यातील 8 ब्रिटिश, एक अमेरिकन आणि 1 जर्मन आणि एक आयरिश संशोधक होता. या सर्वांची भाषा वेगळी होती, परंतु उच्चारण परस्परांशी मिळतेजुळते होते. त्यांचे अनेक शब्द आणि बोलण्याची पद्धत एकसारखीच होती. यालाच ‘अंटार्क्टिका एक्सेंट’ नाव देण्यात आले आहे. अंटार्क्टिकात वैज्ञानिक आणि संशोधक सायंटिफिक रिसर्च स्टेशनमध्येच राहतात. येथे 66 सायंटिफिक रिसर्च स्टेशन्स आहेत.
आयएफएल सायन्सनुसार आवाजाच्या अध्ययनात संशोधक वॉवल्स (स्वर)चा उच्चार दीर्घ करत होते. उच्चारातील बदल ओळखणे अवघड होते, परंतु तो नोंदविता येत होते असे संशोधक जॉनाथन हॅरिंग्टन यांनी म्हटले आहे. विविध देशांचे लोक जगातील अन्य ठिकाणी एकत्र राहत असल्यास नवा एक्सेंट विकसित होण्याची शक्यता बळावते हे या अध्ययनातून स्पष्ट झाले आहे. ही स्थिती इंग्रजी भाषेला अमेरिकन इंग्रजी, ब्रिटिश इंग्लिश आणि ऑस्ट्रेलियन इंग्लिशमध्ये बदलण्यासारखी आहे. जर कधी अंतराळवीरांना मंगळ ग्रहावर मोहिमेसाठी पाठविण्यात आल्यास आपण अशाच एका नव्या एक्सेंटची अपेक्षा करू शकतो असे हॅरिंग्टन म्हणाले.
बहुतांश वेळ काळोख
अंटार्क्टिकात जगभरातून वैज्ञानिक येत असल्याने याचे नाव ‘द इंटरनॅशनल कॉन्टिनेंट’ देखील ठेवण्यात आले आहे. अंटार्क्टिकात हिवाळ्यात सातत्याने काळोख असतो. येथे राहणे अत्यंत अवघड असते असे ब्रिटिश हवामान वैज्ञानिक एलेक्स गॅफिकिन यांनी म्हटले आहे. खराब हवामानामुळे अन्नाची समस्या असते, आमच्याकडे मर्यादित अन्नपुरवठा असतो, तसेच त्याचा वारंवार पुरवठा केला जाऊ शकत नाही.









