वृत्तसंस्था/ बेंगळूर
येथील कोरमंगला इनडोअर स्टेडियममध्ये सुरू असलेल्या प्राईम व्हॉलिबॉल लिग स्पर्धेत शनिवारी झालेल्या सामन्यात कालिकत हिरोजने हैद्राबाद ब्लॅक हॉक्सचा पराभव केला. या स्पर्धेतील कालिकत हिरोजचा हा दुसरा विजय आहे.
शनिवारच्या सामन्यात कालिकत हिरोजने हैद्राबाद ब्लॅक हॉक्सचा 15-14, 15-12, 15-11, 4-15, 15-14 असा पराभव केला. या सामन्यात कालिकत हिरोज संघातील अश्विनला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले.









