फ्लोरिडा
अमेरिकेच्या फ्लोरिडा येथे एका बार अँड रेस्टॉरंटबाहेर सोमवारी गोळीबाराची घटना घडली. टँपा शहरात झालेल्या गोळीबारात एकाचा मृत्यू झाला असून सहा जण जखमी झाले आहेत. बारमध्ये दोन गटात वाद झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. त्यानंतर गोळीबार सुरू झाला. दोन गटातील गँगवॉरमधून ही घटना घडल्याचे सांगितले जात आहे. तथापि, अमेरिकेमध्ये गोळीबाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे लोकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरलेले दिसत आहे.









