वृत्तसंस्था / चंदीगढ
हरियाणातील ज्येष्ठ पोलीस अधिकारी वाय. पूरण कुमार यांच्या आत्महत्येचे प्रकरण गाजत असतानाच याच राज्यात आणखी एका पोलीस अधिकाऱ्याने आत्महत्या केल्याचे प्रकरण समोर आले आहे. असिस्टंट सब इन्स्पेक्टर संदीप कुमार असे त्यांचे नाव आहे. त्यांचा मृतदेह रोहटक नजीकच्या एका ट्यूबवेलजवळ आढळला आहे. त्यांनी आत्महत्याच केल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. मात्र, यासंबंधीची निश्चित माहिती पूर्ण तपास झाल्यानंतरच उघड होईल, असे हरियाणाच्या पोलिस विभागाने स्पष्ट केले आहे. ही आत्महत्या पूरण कुमार यांच्या आत्महत्या प्रकरणासी संबंधित आहे काय, याचाही तपास केला जाणार आहे.









