ऑनलाईन टीम / तरुण भारत :
उद्धव ठाकरे गटाचा आणखी एक मोहरा आज शिवसेनेत दाखल होईल, असं सूचक ट्विट शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश मस्के यांनी केलं आहे. मस्के यांच्या ट्विटमुळे राजकीय नेत्यांच्या भुवया उंचावल्या असून, वेगवेगळे तर्क-वितर्क लढवले जात आहेत.
मस्के यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की,
आज ‘उबाठा’चा आणखी
एक मोहरा कमी होईल
खऱ्या शिवसेनेत येऊन
विचारांशी निष्ठा ठेवील
नाहीच राहू शकत तिथे
खरे कार्यकर्ते आता
स्मशान शांतता पसरणार तिकडे
मारोत कुणी काही बाता
सुपडा साफ होणार आणि
तुमचे उखळ पांढरे होणार
‘उठा’ तुमच्यावर लवकरच
झोपायची वेळ येणार
ED चा फेरा ठेपलाच आहे
येऊन तुमच्या दारी
म्यान करून ठेवा
तुमच्या गंजल्या तलवारी
आज 'उबाठा'चा आणखी
एक मोहरा कमी होईल
खऱ्या शिवसेनेत येऊन
विचारांशी निष्ठा ठेवीलनाहीच राहू शकत तिथे
खरे कार्यकर्ते आता
स्मशान शांतता पसरणार तिकडे
मारोत कुणी काही बातासुपडा साफ होणार आणि
तुमचे उखळ पांढरे होणार
'उठा' तुमच्यावर लवकरच
झोपायची वेळ येणारED चा फेरा ठेपलाच आहे… pic.twitter.com/5PwBC1nsQk
— Naresh Mhaske (@nareshmhaske) June 27, 2023
आज दुपारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत वर्षा निवासस्थानी संबंधित नेत्याचा शिवसेनेत पक्ष प्रवेश होणार असल्याचेही मस्के यांनी म्हटले आहे. मात्र, पक्षप्रवेश करणाऱ्या व्यक्तीचे नाव अद्याप गुलदस्त्यात आहे. त्यामुळे आज कोणता नेता ठाकरे गटाची साथ सोडणार याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.








