► वृत्तसंस्था / श्रीहरिकोटा
चांद्रयान-3 नंतर इस्रो इस्रो आता नवी मोहीम प्रक्षेपित करणार आहे. 30 जुलै रोजी इस्रो एकाचवेळी 7 उपग्रह प्रक्षेपित करणार आहे. इस्रोची ही प्रक्षेपण मोहीम वाणिज्यिक स्वरुपाची आहे. या मोहिमेतील बहुतांश उपग्रह हे सिंगापूरचे आहेत. पीएसएलव्ही-सी56 रॉकेटद्वारे लाँच पॅड एकवरून हे प्रक्षेपण पार पडणार आहे. प्रक्षेपणाची वेळ सकाळी 6.30 वाजता निर्धारित करण्यात आली आहे.
डीएस-एसएआर उपग्रह सिंगापूरचे संरक्षण शास्त्र अन् तंत्रज्ञान एजेन्सी (डीएसटीए) आणि एसटी इंजिनियरिंगदरम्यान भागीदारीच्या अंतर्गत निर्माण करण्यात आला आहे. याचा वापर एसटी इंजिनियरिंग स्वत:च्या वाणिज्यिक ग्राहकांसाठी मल्टी मॉढेल आणि उच्च प्रतिक्रियाशीलता इमेजरी आणि भू-स्थानिक सेवांसाठी करणार आहे. डीएस-एसएआर इस्रायल एअरोस्पेस इंडस्ट्रीजकडून विकसित सिंथेटिक एपर्चर रडार (एसएआर) पेलोड राखु आहे. हा डीएस-एसएआरला कुठल्याही ऋतूत पूर्णवेळ कव्हरेज प्रदान करण्याची क्षमता मिळवून देतो. हा उपग्रह स्वत:च्या निर्धारित कक्षेत स्थापित झाल्यावर सिंगापूरच्या सरकारला अचूक नकाशा तयार करण्यास मदत होणार आहे. या उपग्रहाकडून सिंगापूर सरकारला अंतराळातून काढण्यात आलेली छायाचित्रे प्राप्त होणार आहेत.
एसटी इंजिनियरिंग या उपग्रहाचा वापर अनेक प्रकारची छायाचित्रे काढण्यास करणार आहे. जियोस्पेशियल सर्व्हिसेसकरता ही मोहीम साकारण्यात येणार आहे. डीएस-एसएआरमध्ये सिंथेटिक अपर्चर रडार पेलोड असून तो इस्रायल एअरोस्पेस इंडस्ट्रीजने तयार केला आहे. हा उपग्रह कुठल्याही ऋतूत दिवसा किंवा रात्रीही छायाचित्रे काढत राहणार आहे.
हा उपग्रह 360 किलोग्रॅम वजनाचा असून त्याला पीएसएलव्ही-सी56 रॉकटद्वारे अंतराळाच्या नीयर इक्वेटोरियल ऑर्बिटमध्ये (एनईओ) सोडले जाणार आहे. ही कक्षा सुमारे 535 किलोमीटर उंचीवर आहे. याचबरोबर आणखी 6 छोटे उपग्रह प्रक्षेपित केले जाणार असून ते सर्व मायक्रो किंवा नॅनो उपग्रह आहेत.
मोहिमेत सामील उपग्रह
व्हेलोक्स-एएम : हा 23 किलोग्रॅमचा टेक्नॉलॉजी डिमॉन्स्ट्रेटर मायक्रोसॅटेलाइट आहे.
आर्केड : हा एक प्रायोगिक उपग्रह असून याचे पूर्ण नाव अॅटमॉस्फियरिक कपलिंग अँड डायनेमिक एक्सप्लोरर.
स्कूब-2 : हा एक 3यू नॅनोउपग्रह असून त्याच्याद्वारे विशेष प्रकारच्या तांत्रिक प्रात्यक्षिकाचे परीक्षण केले जाईल
नूलायन : नूस्पेसकडून निर्मिती. हा एक अत्याधुनिक 3यू नॅनोउपग्रह आहे. इंटरनेट ऑफ थिंग्सची सुविधा प्रदान करता येणार.
गॅलास्सिया-2 : हा देखील 3यु नॅनोउपग्रह असून त्याला पृथ्वीच्या कनिष्ठ कक्षेत स्थापित केले जाणार.