अमरावती
आंध्रप्रदेशचा विद्यार्थी जी. साई सूर्या अविनाश याचा अमेरिकेत पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. 7 जुलै रोजी न्यूयॉर्कच्या अल्बानी येथे बार्बरविले फॉल्समध्ये त्याचा बुडून मृत्यू झाला होता अशी माहिती भारताच्या महावाणिज्य दूतावासाने मंगळवारी दिली आहे. अविनाशचे पार्थिव शरीर भारतात आणण्यासाठी सर्व आवश्यक सहाय्य प्रदान केले जात असल्याचे दूतावासाकडून सांगण्यात आले. अविनाश हा 18 महिन्यांपूर्वीच अमेरिकेत एमएस अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी गेला होता.









