अन्य दोन महिलांवर अत्याचाराचा प्रकार उघड
वृत्तसंस्था./ इंफाळ
मणिपूरमध्ये मे महिन्यापासून सुरू असलेल्या जातीय हिंसाचारात महिलांवर झालेल्या क्रूरतेची आणखी एक ताजी घटना समोर आली आहे. दोन महिलांची विवस्त्र धिंड काढण्यात आलेल्या 4 मे रोजीच्या घटनेदरम्यानच आणखी दोन आदिवासी तरुणींवर सामूहिक अत्याचार केल्याची घटना उघड झाली आहे. सदर महिला कांगपोकपी येथील रहिवासी असून त्या एका गॅरेजमध्ये कार धुण्याचे काम करत होत्या. यातील एक महिला 21 तर दुसरी 24 वर्षांची होती. अत्याचारानंतर दोन्ही महिलांचा एकाच दिवशी ऊग्णालयात मृत्यू झाला होता.
मणिपूरमध्ये रक्तपात करणाऱ्या जमावाच्या गुन्ह्यांची यादी दिवसेंदिवस लांबत चालली आहे. 4 मे रोजी मणिपूरमध्ये जमावाने दोन महिलांना विवस्त्र करून त्यांची धिंड काढण्यात आली. त्याच दिवशी आणखी दोन महिलांवर बलात्कार करून त्यांची हत्या करण्यात आल्याचे पीडितेसोबत काम करणाऱ्या एका व्यक्तीने सांगितले. त्या दिवशी पीडित महिलाही मोर्चासाठी आल्या होत्या. याचदरम्यान काही महिलांनीच गर्दीत उपस्थित पुऊषांच्या स्वाधीन त्यांना केल्याचा दावा केला जात आहे. त्यांच्यावर अत्याचार केल्यानंतर त्या रक्ताने माखल्या होत्या, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
काही दिवसांनी एफआयआर
या घटनेसंबंधी पीडित महिलांच्या नोतवाईकांशी संपर्क साधला असता 16 मे रोजी त्यांनी सायकुल पोलीस ठाण्यात शून्य एफआयआर दाखल केला होता. सुरुवातीला घाबरल्यामुळे पूर्वी अहवाल नोंदवण्याचे धाडस केले नाही. नंतर वातावरण थोडे शांत झाल्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सांगितले. एफआयआरनुसार, दोन्ही मुलींवर अत्याचार आणि नंतर निर्घृण हत्या करण्यात आल्याची नोंद झाली आहे. या घटनेत 100-200 लोक उपस्थित असल्याचा उल्लेख आहे. हे प्रकरण आता पोरोमपाट पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आले आहे. याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.









