Another honorable tour in the vein of Sindhudurg
सावंतवाडीच्या कु.ज्यो आर्यन माडतीसचा दिल्लीतील प्रजासत्ताक दिनाच्या समारोहाच्या बीटिंग रिट्रेट संचलनात नौदलाच्या तुकडीतून सलग तिसऱ्यांदा समावेश
सावंतवाडीतील मिलाग्रीस हायस्कूलचा माजी विद्यार्थी कु.ज्यो आर्यन मायकल माडतीस याची आय.एन.एस.कुंजली मुंबई येथे भारतीय नौदलात 2019 भरती झाली आहे.मिलाग्रीस हायस्कूल मधील सह.शिक्षिका सौ.असुप्तिना माडतीस व श्री.मायकल माडतीस या दांपत्याचा हा मेहनती व गुणवंत मुलगा!आपले शालेय शिक्षण मिलाग्रीस हायस्कूलमध्ये पूर्ण करत असताना त्याला तत्कालीन सर्व मुख्याध्यापक फादर फेलिक्स लोबो,फादर आँलविन गोन्साल्विस आणि कार्यरत मुख्याध्यापक फादर रिचर्ड सालदाना तसेच उपमुख्याध्यापिका सिस्टर मेबल कार्व्हालो,पर्यवेक्षिका,सर्व आजी-माजी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
शालाबाह्य क्लासेसमध्ये नाडकर्णी क्लासेस व सुयश उकिडवे क्लासेस यांचे देखील मार्गदर्शन लाभले.मुळातच संगीताची आवड असणाऱ्या ज्योअरियनला इयत्ता पाचवीपासूनच श्री.जाँन डिसिल्वा यांनी घरी येऊन संगीताचे प्राथमिक धडे दिले.ज्योआर्यन इयत्ता सहावीत असल्यापासून मिलाग्रीस प्रशालेचे संगीत शिक्षक श्री.स्वप्नील गोरे यांनी शालेय परिपाठात पहिल्यांदा हार्मोनियम व बासरी वाजवायची संधी दिली आणि सातवीपासून बारावीपर्यंत त्याला तत्कालीन पँरिश प्रिस्ट फादर फ्रान्सिस डिसोजा आणि फादर इलियास राँड्रिक्स तसेच त्यावेळची काँयर मिस्ट्रेस सौ.मोनिका फर्नांडिस यांनी चर्चमध्ये प्रार्थनेला किबोर्ड वाजवण्यास प्रोत्साहन दिले.लहानपणीच त्याने आपण भारतीय नौदलात दाखल होऊन देशाची सेवा करायचे स्वप्न उराशी बाळगले आणि ते पूर्ण करण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली.सन-२०२१ मध्ये दिल्लीमधील प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य परेडसाठी निवडक ३०जणांच्या तुकडीत समावेश असणारा ज्योआर्यन हा सिंधुदुर्गातील एकमेव युवक ठरला.प्रजासत्ताक दिनाची मुख्य परेड २०२२च्या सांगता समारोह परेड(Beating Retreat)मध्ये त्याचा समावेश होता.यावर्षी दिल्लीतील २०२३च्या दिनांक-२९ जानेवारीला पार पडणाऱ्या सांगता समारोह Beating Retreat ला आपले कौशल्य सादर करणाची संधी ज्योआर्यनला मिळाली आहे,निश्चितच ही बाब आम्हा सर्व सिंधुदुर्गवासियांसाठी गौरवास्पद आहे.
सावंतवाडी / प्रतिनिधी









