बेळगाव :
बेळगाव-बेंगळूर असा विमान प्रवास करणाऱ्यांना आता आणखी एक विमान उपलब्ध होणार आहे. स्टार एअरने नुकतीच या नव्या विमानफेरीची घोषणा केली आहे. आठवड्यातून दोन दिवस ही विमानफेरी उपलब्ध असणार आहे. दि. 16 फेब्रुवारीपासून मंगळवार व रविवार असे दोन दिवस बेंगळूर-बेळगाव असा विमानप्रवास करता येणार आहे.
सकाळी 7.40 वाजता बेळगावमधून निघालेले विमान 8.55 वाजता बेंगळूरला पोहोचेल. तर दुपारी 12.45 वाजता बेंगळूरहून निघालेले विमान दुपारी 2 वाजता बेळगावला पोहोचेल. एकूण 50 आसन क्षमता असलेले विमान प्रवाशांना उपलब्ध होणार आहे.









