Turkey Earthquake : तुर्कस्तान आणि सीरियामध्ये आज सकाळी बसलेल्या ७.८ रिश्टर स्केलच्या भूकंपाने मोठा हाहाकार माजला आहे. तुर्कस्तान आणि सीरियामध्ये झालेल्या भूकंपात जवळपास ३०० हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाल्याचे तर, हजारो नागरिक जखमी झाल्याचे सांगितले जात आहे. याशिवाय या दोन्ही ठिकाणी मोठ्या प्रमाणात इमारती उद्धस्त झाल्या आहेत.दरम्यान, दक्षिण तुर्कीमधील कहरामनमारा प्रांतातील एल्बिस्तान जिल्ह्यात ७.६ रिश्टर स्केलचा आणखी एक भूकंपाचा धक्का बसला असल्याची माहिती तुर्कीच्या अनादोलू वृत्तसंस्थेने दिली आहे. या दुर्घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला असून तुर्कीला आवश्यक ती सर्व प्रकारच्या मदतीची घोषणा केली.बंगळुरु येथील इंडिया एनर्जी वीक २०२३मध्ये बोलताना त्यांनी ही घोषणा केली.
मोदी म्हणाले,तुर्कीच्या जवळच्या देशांमध्येही या भूकंपाचे धक्के जाणवले असून नुकसानंही झालं आहे. १४० कोटी भारतीयांकडून या भूकंपातील पीडितांप्रती सद्भावना व्यक्त करतो,असंही मोदी यावेळी म्हणाले.तुर्कीमधील भूकंपग्रस्त नागरिकांना सर्वप्रकारची शक्य ती मदत करण्यास भारत सरकार तयार असल्याचे मोदी म्हणाले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









