मुंबई :
देशाच्या विदेशी चलन साठ्यामध्ये पुन्हा एकदा घट झाली आहे. 6 ऑक्टोबर रोजी संपलेल्या आठवड्यामध्ये विदेशी चलन साठ्यात 2.166 अब्ज डॉलर्सची घसरण झाली असून विदेशी चलन साठा 584.742 अब्ज डॉलर्स वर पोहोचला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांनी या संदर्भातली माहिती दिली आहे. ऑक्टोबर 2021 मध्ये देशातील विदेशी चलन साठा हा सर्वकालिक विक्रमी स्तरावर म्हणजेच 645 अब्ज डॉलर्सवर पोहोचला होता पण अलीकडच्या काळामध्ये मात्र विदेशी चलन साठ्यामध्ये सातत्याने घटीचा अनुभव पाहायला मिळतो आहे. रुपयावरील दबावाच्या कारणास्तव रिजर्व्ह बँकेला विदेशी चलन साठ्यावर नियंत्रणासाठी उपाययोजना कराव्या लागत आहेत.









