कुनो
मध्यप्रदेशच्या कुनो नॅशनल पार्कमध्ये विदेशातून आणले गेलेल्या आणखी एका चित्त्याचा मृत्यू झाला आहे. हा चित्ता दक्षिण आफ्रिकेतून आणला गेला होता. तीन महिन्यांमध्ये या राष्ट्रीय उद्यानात तिसऱ्या चित्त्याचा मृत्यू झाला आहे. यापूर्वी नामीबियातून आणले गेलेल्या चित्त्याचा मृत्यू झाला होता. नामीबियातून आणले गेलेल्या साशा या चित्त्याचा मार्चमध्ये मृत्यू झाला होता. तर एप्रिलमध्ये दक्षिण आफ्रिकेतून आणले गेलेल्या उदय चित्त्याचा मृत्यू झाला होता. नामीबिया आणि दक्षिण आफ्रिकेतून कुनो नॅशनल पार्कमध्ये 20 चित्ते आणले गेले होते. आता यातील 17 चित्ते शिल्लक राहिले आहेत.









