तासगाव :
तालुक्यातील वायफळे येथील ओंकार उर्फ रोहित संजय फाळके याच्या खूनप्रकरणी आणखी एकाला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. तासगाव पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण शाखेने पुणे येथे भारती विद्यापीठ परिसरात ही कारवाई केली. विकास उर्फ सोन्या गंगाराम राठोड (वय २३, मूळ रा. अक्कलकोट दिघेवाडी, जि. सोलापूर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी आतापर्यंत ६ जणांना अटक झाली आहे. या खुनप्रकरणी आतापर्यंत मुख्य संशयित विशाल सज्जन फाळके यांच्यासह अनिकेत संतोष खुळे (वय १९, रा. कात्रज, पुणे), आकाश महिपत मळेकर (वय २०, रा. पापळ वस्ती, बिबेवाडी), गणेश प्रकाश मळेकर (वय २१, रा. मांगडेवाडी, कात्रज, मूळ गाव मळे, ता. भोर) या चौघांसह अल्पवयीन आरोपी जेरबंद करण्यात आला होता. आज विकास राठोड या सहाव्या आरोपीच्या मुसक्या आवळल्या.








