ओटवणे प्रतिनिधी
Annual prize distribution ceremony of Charatha School No. 1 in excitement
चराठा येथील अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळा नं १ चा वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या व्यासपिठावर चराठा प्रचिती कुबल, उपसरपंच अमित परब, माजी सभापती गौरी पावसकर, माजी सरपंच बाळू वाळके, माजी उपसरपंच मोहन परब, केंद्रप्रमुख नरेंद्र सावंत, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष समीर नाईक, उपाध्यक्ष गीता कुबल, चंद्रकांत वेजरे, मुख्याध्यापक वर्षा देसाई, ग्रामपंचायत सदस्य वृंदा मेस्त्री, सौ श्रावणी बिर्जे, दिगंबर पावसकर, पुरुषोत्तम परब आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमात विविध कला क्रीडा व परीक्षांमध्ये यश संपादन केलेल्या शाळेतील आस्था अमित लिंगवत, सोहम बापूशेठ कोरगावकर, श्रावणी बळवंत सोमवंशी, आयुष प्रवीण परब, शुभंकर संजय कुबल, सृष्टी सुधीर गावडे, आदिती किशोर रावराणे, सिया समीर नाईक, आराध्या मंजुनाथ देसकर, दुर्वी चंद्रकांत वेजरे, वेदांत विठ्ठल दराडे, ऋतुजा विलास राऊळ, मयुरेश मेस्त्री, साक्षी रवींद्र गुरव, श्रीयोग नितीन कारेकर, श्रीपाद संजय नाईक, आकाश प्रवीण सावंत, वैदेही विनायक बिर्जे, सृष्टी गोविंद परब, हेमांगी गजानन मेस्त्री आदी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्याहस्ते गौरविण्यात आले.यावेळी उपस्थित मान्यवरांनी विविध स्पर्धा कला क्रीडा व परीक्षांमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले. या सर्व विद्यार्थ्यांना चराठा गावातील माजी सैनिक कै दाजी वेजरे यांच्या स्मरणार्थ चंद्रकांत वेजरे यांनी पारितोषिके पुरस्कृत केली होती. तसेच निवृत्त कृषी अधिकारी काका परब आणि शिक्षिका जयश्री पेडणेकर यांनीही विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन गौरविले. यावेळी शाळेतील मुख्याध्यापक व सर्व शिक्षकांचाही सन्मान करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका वर्षा देसाई यांनी सूत्रसंचालन अनघा निरवडेकर यांनी तर आभार बापुशेठ कोरगावकर यांनी मानले.









