Annual meeting of Kshatriya Maratha Ghadigaonkar Seva Samaj in excitement
क्षत्रिय मराठा घाडीगावकर सेवा समाजाच्या बोरिवली विभागाचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न झाले. यावेळी क्रिडा क्षेत्रात यश देदीप्यमान कामगिरी बजावलेल्या घाडीगावकर समाजातील मुलींचा सन्मान करण्यात आला.मालाड पूर्व येथे टोपीवाला मनपा स्कूलच्या सभागृहात घाडीगावकर समाजाचे बोरिवली विभागाचे अध्यक्ष प्रफुल्ल घाडी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या या स्नेहसंमेलनाच्या व्यासपिठावर प्रमुख पाहुणे म्हणून समाजाचे अध्यक्ष घनश्याम गांवकर, सरचिटणीस गजानन घाडीगावकर, अंधेरी विभाग अध्यक्ष विजय घाडीगावकर, महिला समिती प्रमुख रश्मी घाडीगावकर, दर्शना घाडी, सुहासिनी घाडी, शरद घाडी, भिकाजी घाडी, ज्योती घाडी आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी घनश्याम गांवकर यांनी घाडीगावकर समाजाचे सिंधुदुर्ग जिल्हयातील नियोजित समाज भवन वागदे – कणकवली लवकरच उभारण्यासाठी सर्वांनी मदत करावी असे आवाहन केले. यावेळी गजानन घाडीगांवकर यांनी समाजातील सर्वाना एकत्र आणण्याच्या उद्देशाने हे वार्षिक स्नेहसंमेलन घेत असल्याचे सांगितले. प्रफुल्ल घाडी यांनी घाडीगावकर समाजाच्यावतीने याच ठिकाणी येत्या १२ रोजी महिला दिन साजरा करण्यात करण्यात येणार असल्याचे यावेळी जाहीर करुन महिलाच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी विविध कार्यक्रमांचे करण्यात येणार असल्याचे सांगितले.
या कार्यक्रमात वल्ड किंग बॉक्ससींग फाईट स्पर्धेतील विजेती कुमारी रिद्धी घाडीगावकर तसेच राज्यस्तरीय तायकांदो स्पर्धेतील विजेती कुमारी पेडूरकर या दोघींचा शाल, श्रीफळ, ट्रॉफी देऊन सन्मान करण्यात आला. त्यानंतर सागर घाडी आणि जयेश घाडी यांच्या स्वरसंगीताच्या कार्यक्रमाने उपस्थित रसिक मंत्र मुग्ध झाले . यावेळी मालाड ते विरार पर्यंतचे सर्व घाडीगावकर समाज बांधव उपस्थित होते.या कार्यक्रमांचे प्रास्ताविक अशोक घाडीगावकर तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सतीश घाडीगावकर यांनी केले.
ओटवणे प्रतिनिधी









