प्रतिनिधी/ बेळगाव
संघटनेच्या माध्यमातून महिलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात सामावून घेता येईल. सामूहिक प्रशिक्षणाचे आयोजन करून त्यात महिलांना सहभागी करून घेतल्यास त्या आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊ शकतात, असे प्रतिपादन किशोरी श्रेकर यांनी केले. ढोर गल्ली, वडगाव येथील दुर्गादेवी मंदिरात अखिल कर्नाटक कक्कय्या हिंदू ढोर समाज महिला मंडळाच्या वार्षिक बैठकीत त्या बोलत होत्या.
या बैठकीत महिलांसाठीचा विशेष प्रशिक्षण कार्यक्रम व समाजाच्या विकासावर व्यापक चर्चा करण्यात आली. ज्येष्ठ महिलांचा गुलाबाची रोपे देऊन विशेष सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी महिला संघाच्या अध्यक्षा अश्विनी श्रेकर होत्या. रेणुका होतागी यांनी प्रास्ताविक तर स्नेहा कदम यांनी परिचय करून दिला. रेखा आप्पाजी यांनी आभार मानले. कार्यक्रमाला विठ्ठल पोळ, चंद्रकांत कदम, प्रभाकर पोळ, सुभाष नारायणकर आदी उपस्थित होते.









