वृषभ राशीच्या व्यक्ती कल्पनाविलासात रमत असल्या तरी योग्यायोग्यतेचा अंदाज लावू शकत नाहीत. या अत्यंत सुंदर आणि आकर्षक व्यक्तिमत्वाच्या असतात. नेहमी दुसऱ्याच्या नजरेत आपली प्रतिमा चांगली आणि आदर्श बनविण्याचा प्रयत्न करत असतात. कोणाच्याही हाताखाली काम करताना या व्यक्तींना अजिबात आनंद मिळत नाही. जोडीदार म्हणून वृषभ राशीच्या व्यक्ती अत्यंत विश्वासार्ह असतात. फॅशनच्या बाबतीत यांचा हात कोणी धरू शकत नाही.
- चिन्ह – बैल
- राशीस्वामी – शुक्र
- शुभवार – शुक्रवार
- अशुभ वार– शनिवार
- घात मास – मार्गशीर्ष
- शुभ रंग- पांढरा व गुलाबी
- भाग्यरत्न – हिरा
- आराध्य दैवत- श्री कुलदेवता
षभ राशीच्या व्यक्तींची कल्पना शक्ती अत्यंत चांगली असते. पण असं असलं तरी आपल्यासाठी काय योग्य आणि काय अयोग्य याचा अंदाज या व्यक्ती लावू शकत नाहीत. नेहमी दुसऱ्याच्या नजरेत आपली प्रतिमा चांगली आणि आदर्श बनविण्याचा त्या प्रयत्न करत असतात. वृषभ राशीच्या व्यक्ती जिद्दी असतात आणि कोणत्याही गोष्टीसाठी कितीही वेळ वाट पहायची तयारी असते. या दोन्ही विरोधाभास असणाऱ्या गोष्टी या लोकांना खास बनवतात. कारण अशा व्यक्ती फारच कमी प्रमाणात बघायला मिळतात. या व्यक्ती नैसर्गिक आणि सुंदर गोष्टींकडे जास्त आकर्षित होतात. आरामदायी आणि इमानदार या दोन शब्दांचा अर्थ या व्यक्तींकडे बघून लक्षात येतो. या राशीच्या अधिकांश व्यक्ती या अत्यंत सुंदर आणि आकर्षक व्यक्तिमत्वाच्या असतात आणि या व्यक्तींसाठी समोरची व्यक्ती तितकीच आकर्षक असणंही महत्त्वाचं असतं, यांचा स्वभाव कठोर असून बऱ्याचदा दुसऱ्यांना या व्यक्ती कमी लेखतात. मनाने अत्यंत चांगल्या असतात. कोणतीही गोष्ट आवडली नाही तर त्या गोष्टीबाबत आपली नाराजी या व्यक्ती स्पष्टपणे सांगतात. राग आल्यावर या व्यक्ती तो खूपच मोठ्या आवाजात व्यक्त करतात. दुसऱ्यांच्या नजरेत आदर्श व्यक्ती बनण्याचा यांचा प्रयत्न असतो. आरामदायी आणि आपल्या मस्तीत जगणारे हे दोन शब्द यांचे वैशिष्ट्या आहे. दुसऱ्यांवर हुकूमत गाजवायला या व्यक्तींना खूपच आवडते. त्यामुळे कोणाच्याही हाताखाली काम करताना या व्यक्तींना अजिबात आनंद मिळत नाही. जोडीदार म्हणून वृषभ राशीच्या व्यक्ती अत्यंत विश्वासार्ह आणि चांगल्या असतात. या व्यक्ती ज्यांच्यावर प्रेम करतात त्यांच्यावर पूर्ण अधिकार असावा असं या व्यक्तींना वाटतं. प्रेमाने या व्यक्तींकडून काहीही करून घेणं शक्य आहे. यांच्या इच्छेविरुद्ध कोणतीही गोष्ट करून घेणं अशक्य आहे. या व्यक्तींची इच्छा असेल तरच या व्यक्ती प्रेमाने काम करतात. फॅशनच्या बाबतीत या व्यक्तींचा हात कोणी धरू शकत नाही, घरामध्ये कसेही राहिले तरीही बाहेर मात्र नेहमीच अप्रतिम दिसायचा यांचा प्रयत्न असतो.
ग्रहमान
एप्रिल 2024 पर्यंत तुमच्या खर्चात वृद्धी होऊ शकते कारण, बृहस्पती तुमच्या बाराव्या भावात उपस्थित असेल आणि याच्या परिणामस्वरूप तुम्हाला लाभ आणि खर्च दोघांचा सामना करावा लागू शकतो. 1 मे 2024 पासून बृहस्पती चंद्र राशीच्या पहिल्या भावात विराजमान असेल. या काळात धन लाभ होऊ शकतो. तथापि, 1 मेपासून बृहस्पती तुम्हाला पैतृक संपत्ती किंवा अन्य स्रोतांनी धन लाभ प्रदान करू शकतात. हा काळ आर्थिक बाबतीत वृद्धी आणि बचत करण्यातही सक्षम असेल. शनी तुमच्या दहाव्या भावात उपस्थित असेल. शनीची ही स्थिती तुमच्यासाठी अनुकूल सिद्ध होईल. परंतु, सोबतच तुम्ही या काळात तुमच्या कामात अधिक व्यस्त राहाल. याच्या परिणामस्वरूप, तुम्हाला विदेशात नवीन संधी प्राप्त होऊ शकतात. या काळात तुमच्यावर कामाचा अधिक बोजा असल्याने तुम्हाला आराम करण्यासाठी पर्याप्त वेळ मिळणार नाही. योगकारक ग्रह शनी देवाचे पूर्ण वर्ष दशम भावात राहण्याने तुम्ही मेहनतही कराल. उत्तम प्रतिफळही मिळेल. भाग्य आणि कर्माचे बंधन बनण्याने तुम्हाला आपल्या करिअरमध्ये राजयोगाचा प्रभाव मिळेल. राहूची उपस्थिती पूर्ण वर्ष तुमच्या एकादश भावात कायम राहील. यामुळे इच्छापूर्ती होईल. सामाजिकदृष्ट्या तुमची लोकप्रियता वाढेल. तुमचा आत्मविश्वास वाढेल. पूर्ण वर्ष केतू महाराज पंचम भावात बसलेले राहतील यामुळे तुमच्या प्रियतमाला ठीक समजून घेण्याच्या कारणाने नात्यात समस्या येऊ शकतात. विद्यार्थ्यांच्या शिक्षणात समस्या येऊ शकतात. स्वास्थ्याच्या दृष्टिकोनाने, वर्षाची सुरुवात कमजोर राहील. पंचम भावात केतू, द्वादश भावात बृहस्पती, अष्टम भावात मंगळ आणि सूर्य स्वास्थ्य समस्या उभी करू शकतात. तथापि, वर्षाच्या मध्यात हळू हळू स्वास्थ्यात सुधार दिसतील. विवाहासाठी मे नंतर गुरुबळ सुरू होणार आहे.
नोकरदार
तुमच्या कामाच्या ठिकाणी स्पर्धा निर्माण झाल्यामुळे आणि कामाच्या दबावामुळे तुमच्या कारकीर्दीमध्ये काही अडथळे निर्माण होतील. ही परिस्थिती हाताळण्यासाठी तुम्ही थोडे लवचिक धोरण अवलंबिण्याची गरज आहे. नवे प्रकल्प आणि करिअरमध्ये धोके पत्करू नका. वाद आणि कामाच्या स्वरूपातील बदल टाळा. संवाद साधताना सकारात्मक असा आणि बोलताना किंवा लिखित स्वरूपात अपमानकारक शब्दांचा वापर करू नका. विरुद्ध लिंगी व्यक्तींसोबतचे तुमचे संबंध सलोख्याचे राहणार नाहीत. जोडीदाराची प्रकृती अस्वस्थ राहील. अनावश्यक प्रवास टाळा. तुम्हाला काही अनपेक्षित दु:ख किंवा कोणताही आधार नसलेल्या आरोपांना सामोरे जावे लागेल. व्यावसायिक आघाडीवर फार उत्साहवर्धक काही घडत नसले तरी त्याचा फार मनस्ताप करून घेणं टाळून थोडा आराम करायला शिका. अचानक भावनेच्या आहारी जाऊन किंवा अपेक्षाभंगामुळे नोकरी सोडण्याची इच्छा सोडून द्या. निष्काळजीपणा किंवा दुर्लक्ष केल्यामुळे काही अडचणींचा सामना किंवा अडचणीची परिस्थिती उद्भवू शकते. अपघातासारखे काही प्रसंग ओढवू शकतात आणि आरोग्याची काळजी घेणेही गरजेचे आहे. कौटुंबिक आयुष्यात ताण-तणाव निर्माण होऊन शारीरिक आजार होणार नाहीत, याची काळजी घ्या. मेनंतर अत्यंत उत्पादनक्षम वर्ष असेल त्यामुळे तुम्ही जे काही ध्येय गाठले आहे, त्याचे समाधान तुम्हाला मिळेल. या काळात तुम्ही आयुष्य पूर्ण सकारात्मकतेने आणि चैतन्याने जगाल. प्रवास आणि प्रगतीच्या भरपूर संधी या काळात उपलब्ध होतील. तुमच्या कार्यक्षेत्रात विरुद्ध लिंगी व्यक्तीकडून सहकार्य मिळेल. तुम्ही ज्या आदरास योग्य आहात, तो आदर तुम्हाला या काळात मिळेल आणि तुमचे जीवन अधिक स्थिर होईल. सट्टेबाजारातील व्यवहार फायदेशीर ठरतील. जमीन किंवा वाहन खरेदी कराल.
स्त्री वर्ग
हा तुमच्यासाठी फार समाधानकारक काळ नाही. तुम्हाला कदाचित अचानक आर्थिक नुकसान सोसावे लागेल. प्रयत्नांमध्ये अपयश आल्यामुळे तुम्ही त्रासिक व्हाल. काम प्रचंड असल्यामुळे तुम्हाला खूप कष्ट करावे लागतील. कौटुंबिक आयुष्यातही तणाव निर्माण होईल. उद्योगामध्येही फार धोका पत्करू नका, कारण हा कालावधी तुम्हाला फार अनुकूल नाही. तुमचे विरोधक तुमची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न करतील. तुम्ही अनावश्यक खर्च कराल. आरोग्याच्या कुरबुरी राहतील. वृद्धांना सर्दी आणि सुस्तपणा जाणवण्याचा संभव आहे. तुम्ही जे काम हाती घ्याल, त्यात यशस्वी व्हाल. तुमच्या प्रयत्नांना यश मिळेल आणि तुम्ही सर्व अडचणींवर मात कराल. तुमच्या शत्रुंचा पराजय होईल. नोकरीमध्ये बढतीची शक्यता. तुम्हाला शुभेच्छा आणि आदर मिळेल. कायदेशीर बाबीत जिंकाल. एकुणातच हा यशदायी कालावधी आहे. आगीपासून सावध राहा आणि डोळ्यांना जपा. या वर्षी केवळ एक घटक टाळा तो म्हणजे अति-आत्मविश्वास. घरावर आणि कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्यविषयक तक्रारींवर जरा अधिक खर्च होईल. कौटुंबिक नाती जपण्याकडे कल असू दे. तुमचे कच्चे दुवे शोधून त्यांचा गैरवापर करण्याचा प्रयत्न होईल, त्यामुळे तुम्हाला मनस्ताप होण्याची शक्यता आहे. तुमच्या जोडीदारामुळे तुमच्या आयुष्यात तणाव निर्माण होईल किंवा तुमच्या प्रेमभावनांना ठेच पोहोचण्याची शक्यता आहे. तुमचा प्रवास व्यर्थ जाईल आणि त्याने नुकसान होण्याचीच शक्यता आहे. आरोग्याच्या तक्रारी वाढतील. आरामदायी वस्तुंवर आणि शानशौकीच्या वस्तुंवर खर्च करण्याच्या तुमच्या सवयीमुळे पैसा राखणे कठीण असेल. सट्टेबाजारातील व्यवहारांसाठी हा चांगला काळ नाही. लहानसहान गोष्टींवरून भांडणे, गैरसमज, वाद यामुळे कौटुंबिक शांतता आणि प्रसन्नता ढासळेल. सावध राहा.
विद्यार्थी वर्ग
विद्यार्थ्यांसाठी हे वर्ष अत्यंत प्रतिकूल असेल. जे विद्यार्थी परदेशात शिक्षण घेण्याचा विचार करत आहेत, त्यांच्यासाठी हा काळ चांगला असेल, त्यांना चांगल्या महाविद्यालयात प्रवेश मिळण्याची शक्यता आहे. संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 2024 हे वर्ष खूप आव्हानात्मक आहे. मेनंतर विद्यार्थ्यांची एकाग्रता सुधारेल. पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांना वर्षअखेरीस अधिक फायदा मिळेल. दुसरीकडे, शैक्षणिक विद्यार्थ्यांसाठी हे वर्ष सामान्य राहणार आहे.





