मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांच्या देवस्थानला शुभेच्छा
सांखळी : सांखळी मतदारसंघातिल जागृत देवस्थान श्री देवी महालक्ष्मी कुडणेश्वर देवस्थान कुडणे गोवा तर्फे साजरा करण्यात येणारा होमकुंड जत्रोत्सव सोमवार पासून सुरू झाला आहे.त्यानिमित्त श्रींच्या मुर्तिस अभिषेक.संध्याकाळी नवीन धोंडगण मानवणे, श्री चे सातेरीदेवीच्या तळीवर स्नान करण्यासाठी आगमन, रात्री हरवळे येथील श्री देव ऊद्रेश्वराकडुन भेटीच्या रूपाने आलेली फळे फुलांसह आलेल्या ओटीचा स्वीकार करणे . पहाटे वाजता होमकुंड मंत्राग्नी प्रज्वलित करून धोंडगणांचे स्नान करण्यासाठी सातेरीदेवीच्या तळीवर जाऊन रवळनाथ व देवी महालक्ष्मचा कृपाप्रसादाने धोंडगणांचा हुमकुंडातून अग्निदिव्य करत प्रवेश. पहाटे श्री चे अग्निदिव्य व नंतर मंडपात सर्वांना कौल. देण्यात आला. यानिमित्ताने कुडणेश्वर देव दर्शनासाठी भाविकांची बरीच गर्दी होती.सुहासिनी नी महालक्ष्मी देवीची ओटी भरून नवस पूर्ण केला.मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत ,मयेचे आमदार पेमेंद्र शेठ अन्य राजकीय व्यक्तीनी होमकुंड उत्सव निमित्त देव दर्शन घेतले. यावेळी देवस्थान समिती चे पदाधिकारी उपस्थित होते. पहाटे धोंड (भाविक) यांनी पेडत्या निख्राया वरून प्रवेश केला.हे पाहण्यासाठी गोव्यातील हजारो लोकांनी उपस्थिती लावली होती. आज बुधवार दिनांक 12 रोजी रात्री 11:00 वाजता अयोध्येचा ध्वजदंड हे नाटक, गुऊवार दिनांक 13 रोजी रात्री 11:00 वाजता वन टू का बोरं हे कोंकणी नाटक तर शुक्रवार दिनांक 14 रोजी संध्याकाळी 7:00 वाजता श्री कुडणेश्वर नुतन मंदिर बांधकाम निमित्ताने काढण्यात आलेल्या मदतनिधी कुपनचा सर्वांसमोर निकाल काढण्यात येणार आहे तदनंतर ऑर्केस्ट्रा सादर करण्यात येणार आहे . असे देवस्थान तर्फे कळविण्यात आले आहे.
मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांनी घेतले कुडणेश्वर देवाचे दर्शन
सांखळी मतदारसंघाचे आमदार तथा मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांनी कुडणे येथील कुडणेश्वर महालक्ष्मी देवस्थानच्या वार्षिक होमकुंड जत्रोत्सव निमित्त कुडणेश्वर देवाचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले आणि देवस्थान समितीचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.गोव्यात साजरे होणारे होमकुंड उत्सव खूप पवित्र मानले जात असून यामुळे राज्यभर एक वेगळे भक्तीमय वातावरण निर्मिती होत असते असे मत मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत या विषयावर बोलताना व्यक्त केले. यंदा होमकुंड उत्सवात श्री देव कुडणेश्वर जत्रोत्सव निमित्ताने कुडणे येथे भरण्राया फेरीत गोबी मंच्युरी या खाद्य पदार्थांवर श्री महालक्ष्मी कुडणेश्वर पंचायतन कार्यकारिणी समिती तर्फे पुर्णपणे बंदी घालण्यात आली होती. या निर्णयाचे नागरीकांनी स्वागत केले. राज्यात बहुतेक देवस्थान परिसरात संबंधित खाद्यपदार्थ विक्री करण्राया विक्रेत्यांना मंदिर परिसरात बंदी घातली जात असल्याचे निदर्शनास येत आहे.









