सावंतवाडी । प्रतिनिधी
कोकण मराठी साहित्य परिषदेची 33 वी वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवार 20 सप्टेंबर रोजी कुडाळ येथे कुडाळ हायस्कूल जवळ मराठा मंडळाच्या सभागृहात सकाळी 11.45 वाजता कोकण मराठी साहित्य परिषदेच्या केंद्रीय अध्यक्ष . सौ नमिता कीर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली आहे.या सभेत कार्यकारिणीने सोडलेल्या घटनादुरुस्तीस मान्यता देणे ,नवनिर्वाचित केंद्रीय कार्यकारिणी सन 2025 ,28 आणि त्या कार्यकारिणीने निवड केलेले अध्यक्ष यांना मान्यता देणे आधी विविध विषय आहेत. तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व कोकण मराठी साहित्य परिषदेच्या सदस्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन केंद्रीय कार्यवाह माधव अकलंगे. व कार्याध्यक्ष प्रा. प्रदीप ढवळ यांनी केले आहे.









