बेळगाव : मराठा बँकेची 80 वी वार्षिक सर्वसाधारण सभा मराठा बँकेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.
प्रारंभी बँकेचे चेअरमन दिगंबर पवार यांनी उपस्थित सभासदांचे स्वागत केले. व प्रास्ताविक भाषणात स्पर्धात्मक बँकिंग क्षेत्रामध्ये आपल्या बँकेने केलेल्या प्रगतीबाबत उपस्थित सभासदांना माहिती दिली. तसेच 2021-2022 च्या सरकारी लेखा परीक्षणानुसार बँकेला ऑडीट वर्ग ‘अ’ मिळालेला आहे. व बँकेला यावर्षी निव्वळ नफा 2 कोटी 61 लाख रुपये झाला असल्याचे सांगितले.
बँकेचे जनरल मॅनेजर संतोष धामणेकर यांनी 31 मार्च 2022 अखेर अहवालाचे तसेच इतर सभेपुढील विषय- वार्षिक अहवाल, ताळेबंद पत्रक, नफा तोटा पत्रक, नफा विभागणी, अंदाज पत्रक, घटना दुरुस्ती व अन्य विषयांचे तपशीलवार वाचन करून सविस्तर माहिती दिली.
बँकेचे सभासद सर्वश्री मालोजीराव अष्टेकर, ईश्वर लगाडे, अजित यादव, सुरेश जाधव, मारुती पाटील, अशोक कांबळे, दत्ता नाकाडी, अमित देसाई, नानासाहेब पाटील व इतरांनी चर्चेमध्ये भाग घेऊन एकमताने अहवालाला मंजुरी दिली.
यावेळी बँकेचे संचालक बाळाराम पाटील, बाळासाहेब काकतकर, एल. एस. होनगेकर, बी. एस. पाटील, शेखर हंडे, सुनील अष्टेकर, सुशीलकुमार खोकाटे, विनोद हंगिरकर, मोहन चौगुले, लक्ष्मण नाईक, रेणू किल्लेकर, नयन मिरजकर, बी. बी. खंडागळे, जयराज मोदगेकर व सभासद मोठय़ा संख्येने उपस्थित होते. व्हा. चेअरमन निना काकतकर यांनी आभार मानले.









