प्रतिनिधी/ राय
कुडतरी येथील श्री शांतादुर्गा चामुंडेश्वरी महामाया देवस्थानचा 29 वा वर्धापन दिन सोहळा 11 एप्रिलपासून सुरु होणार असून हा कार्यक्रम 3 दिवस चालणार आहे.
22 एप्रिल रोजी सकाळी विविध धार्मीक विधी, सायंकाळी 5 ते 8 दरम्यान स्थानिक कलाकारांचा भजनाचा कार्यक्रम असेल, रात्री 8 वाजता फॅन्सी ड्रेस व डान्स स्पर्धा आयोजीत केली आहे. ही स्पर्धा 4 ते 9 वयोगटातील मुलांसाठी असेल. रात्री 9 वाजता सत्कार समारंभाचा कार्यक्रम असेल. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कुडतरी मतदारसंघाचे आमदार तसेच गोवा औद्योगिक विकास महामंडळाचे अध्यक्ष आलेक्स रिजीनाल्ड लॉरेन्सो प्रमुख पाहुणे म्हणून असतील.
कुडतरीचे सरपंच कायतान हिलारियो आणि कुडतरीचे माजी सरपंच आणि विद्यमान पंच मिलाग्रीस रोड्राग्स त्याचप्रमाणे माजी सरपंच आणि सामाजीक कार्यकर्ते रुई मिनेझीस सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
रात्री 9.30 वाजता 9 ते 14 या वयोगटातील मुलांसाठी फॅन्सी ड्रेस व डान्स स्पर्धा असेल.
12 एप्रिल रोजी सकाळी विविध धार्मीक विधी, त्यानंतर नवचंडी, पूर्णाहुती, आरती, पावणी व नंतर महाप्रसादाचा कार्यक्रम असेल. सौ. साईली आणि विनायक शेट शिरोडकर नवचंडी विधीचे यजमान आहेत.
अखिल गोवा आमंत्रित भजन स्पर्धा
त्यानंतर दुपारी 3.30 वाजता अखिल गोवा आमंत्रित भजन स्पर्धा होईल. या स्पर्धेनंतर रात्री 9 वाजता श्रींची पालखी. आरत्या व तीर्थप्रसादाचा कार्यक्रम झाल्यानंतर रात्री 10 वाजता ‘काणी नव्या युगाची’ हे विनोदी कोकणी नाटक सादर केले जाईल.
13 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता सत्यनारायण महापूजा होईल. कुडतरी येथील सौ. साईली आणि विनायक शेट शिरोडकर नवचंडी विधीचे यजमान आहेत. दुपारी आरत्या व पावणीनंतर महाप्रसादाचा कार्यक्रम असेल. सं 7 वाजता ‘भजन संध्या’ हा भजनाचा कार्यक्रम आयोजीत केला असून पाडुंरग राऊळ, विठ्ठल शिरोडकर तसेच प्रल्हाद गावस हे गायक कलाकार या भजनात भाग घेणार आहेत. रात्री 10 वाजता ‘झकास 420’ हे विनादी कोकणी नाटक सादर केले जाईल.
11 एप्रिल रोजी स्पर्धेत भाग घेणाऱ्यांनी आपली नावे 6 वाजेपर्यंत देवस्थानच्या सचिवांकडे नोंद करावीत असे देवस्थान समितीने आवाहन केले आहे.









