दिग्दर्शकाने चाहत्यांना दिला विशेष संदेश
जगभरात लोकप्रिय ठरलेली दक्षिण कोरियन वेबसीरिज ‘स्क्विड गेम’च्या चाहत्यांसाठी एक खूशखबर आहे. या डार्क कोरियन ड्रामा वेबसीरिजच्या निर्मात्यांनी याच्या दुसऱया सीझनची घोषणा केली आहे. स्क्विड गेमचे दिग्दर्शक, लेखक, निर्माते ह्वांग डोंग-हुकू यांनी ही घोषणा केली आहे. वेबसीरिजचा दुसरा भाग ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर लवकरच प्रदर्शित केला जाणार आहे.
वेबसीरिजचे दिग्दर्शक ह्वांग डोंग-हुकू यांनी चाहत्यांसाठी एक विशेष संदेश सोशल मीडियावर शेअर केला आहे. ‘रेड लाइट…ग्रीन लाइट! स्क्विड गेम ऑफिशियन सीझन 2 सोबत परत येत आहे’ असे त्यांनी यात नमूद केले आहे. सीरिजचा हा टीझर सोशल मीडियावर मोठय़ा प्रमाणावर व्हायरल होत आहे.

आम्ही एक पूर्ण नव्या राउंडसोब परतत आहोत. मागील वर्षी स्क्विड गेमचा पहिला सीझन सादर करण्यास 12 वर्षे लागली होती. परंतु नेटफ्लिक्सची आतापर्यंतची सर्वात लोकप्रिय सीरिज होण्यास केवळ 12 दिवस लागले होते. स्क्विड गेमचा एक लेखक, दिग्दर्शक आणि निर्माता म्हणून जगभरातील चाहत्यांचे आभार मानू इच्छितो असे त्यांनी म्हटले आहे.
सियोंग गि-हुन परतत आहे, प्रंट मॅन देखील परतणार आहे. यंग-हीचा प्रियकर चोल-सू याच्याशी तुमची भेट घडविण्यात येईल असे त्यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये नमूद पेले आहे. स्क्विड गेमचा पहिला सीझन सप्टेंबर 2021 मध्ये नेटफ्लिक्सवर स्ट्रीम करण्यात आला होता. हा शो भारतासह जगभरातील चाहत्यांना पसंत पडला होता.









