मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कालच पालकमंत्र्यांची घोषणा केली. यानंतर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टिका करण्यास सुरुवात केली आहे. आज नाना पटोले यांनी शिंदे-फडणवीस सरकावर निशाणा साधला आहे. शिंदे फडणवीस सरकारने लोकशाहीची थट्टा चालवली आहे. देवेंद्र फडणवीस आता स्पायडरमॅनसारखं काम करणार काय? असा सवालही केला आहे.
नाना पटोले म्हणाले की, प्रत्येक जिल्ह्याला एक पालकमंत्री असतो. या वेळची व्यवस्था वेगळी आहे. प्रशासनाचं व्यवस्थापन योग्य नाही. महाराष्ट्रात शासनच नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. लोकशाहीची थट्टा सुरू आहे. देवेंद्र फडणवीसांकडे सहा जिल्ह्यांची जबाबदारी आहे. ते आता स्पायडरमॅनसारखं काम करणार काय?
जाणून घ्या राज्यातल्या जिल्ह्यांचे पालकमंत्री:
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – नागपूर, वर्धा,अमरावती,अकोला, भंडारा, गडचिरोली
राधाकृष्ण विखे पाटील- अहमदनगर, सोलापूर
सुधीर मुनगंटीवार-चंद्रपूर,गोंदिया
चंद्रकांत दादा पाटील- पुणे
विजयकुमार गावित- नंदुरबार
गिरीश महाजन- धुळे,लातूर, नांदेड
गुलाबराव पाटील – बुलढाणा
दादा भुसे- नाशिक
संजय राठोड- यवतमाळ, वाशिम
सुरेश खाडे- सांगली
संदिपान भुमरे -औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर)
उदय सामंत- रत्नागिरी, रायगड
तानाजी सावंत-परभणी,उस्मानाबाद (धाराशिव)
रवींद्र चव्हाण- पालघर, सिंधुदुर्ग,
अब्दुल सत्तार- हिंगोली
दीपक केसरकर -मुंबई शहर ,कोल्हापूर
अतुल सावे – जालना, बीड
शंभूराज देसाई – सातारा, ठाणे
मंगलप्रभात लोढा -मुंबई उपनगर
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी








