19 सप्टेंबरला होणार प्रदर्शित
‘गँग्स ऑफ वासेपुर’ यासारख्या हिट चित्रपटाचा दिग्दर्शक अनुराग कश्यपच्या चित्रपटांची चाहते आतुरतेने प्रतीक्षा करत असतात. याचदरम्यान अनुरागने स्वत:च्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. ‘निशानची’ या चित्रपटाचे पोस्टर सादर करण्यासह प्रदर्शनाची तारीही घोषित करण्यात आली आहे.
‘निशानची’ हा चित्रपट 19 सप्टेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात मोनिका पवार, मोहम्मद जीशान अयूब, कुमोध मिश्रा आणि वेधिका पिंटू हे कलाकार मुख्य भूमिका साकारताना दिसून येतील. ब्लॅक कॉमेडी थ्रिलर धाटणीचा हा चित्रपट असणार आहे. चित्रपटाची कहाणी गुन्हे आणि शक्तिप्रदर्शनाच्या थीमवर आधारित आहे. यात दोन जुळ्या भावांमधील संघर्ष दाखविण्यात येणार आहे. निशानची या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर जॉली एलएलबी 3 या चित्रपटाचे आव्हान पेलावे लागणार आहे. या चित्रपटात अक्षय कुमार आणि अरशद वारसी मुख्य भूमिकेत आहेत.









