वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
चीनमधील हेंगझोयु येथे होणाऱ्या आगामी आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी अखिल भारतीय ब्रिज फेडरेशनने पुरुष आणि महिला ब्रिज संघांची घोषणा केली आहे. सदर स्पर्धा 23 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर दरम्यान खेळवली जाणार आहे.
या स्पर्धेसाठी भारतीय ब्रिज संघांची निवड करण्यापूर्वी ग्रेटर नोएडा येथील शिव नादार इन्स्टिट्यूशन ऑफ इमेन्सी येथे 2 ते 18 मार्च दरम्यान आयोजिलेल्या वार्षिक प्रशिक्षण शिबिर आणि निवड चाचणीनंतर भारतीय ब्रिज संघ निवडण्यात आला. येत्या ऑगस्टमध्ये मोरोक्को येथे होणाऱ्या विश्व सांघिक ब्रिज चॅम्पियनशिप स्पर्धेत सध्या आशियाई स्पर्धेसाठी निवडण्यात आलेली विविध चार गटातील संघ भारताचे प्रतिनिधीत्व करतील अशी अपेक्षा आहे. जागतिक स्तरावर कॉन्ट्रॅक्ट ब्रिज हा क्रीडा प्रकार दिवसेंदिवस अधिकच प्रसिद्ध होत आहे. जकार्ता येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत ब्रिज या क्रीडा प्रकाराचा समावेश करण्यात आला होता आणि भारताने जकार्तामधील स्पर्धेत 1 सुवर्ण व 2 कास्यपदके मिळवली होती.
आशियाई स्पर्धेसाठी ब्रिज संघ : खुला विभाग : जॅग्गी शिवदासानी, संदीप ठकराल, राजेश्वर तिवारी, सुमित मुखर्जी, राजू टोलानी अजय खरे, राखीव 1- कौस्तुभ बेंद्रे, एस. कुशारी, प्रशिक्षक-जे. सेनसर्मा.
मिश्र संघ : किरण नादार, बी. सत्यनारायण, हिमानी खंडेलवाल, राजीव खंडेलवाल, मारिने करमरकर, संदीप करमरकर, राखीव 1- हिमा देवरा, राणा रॉय, प्रशिक्षक : विनय देसाई.
महिला संघ : आशा शर्मा, पूजा बात्रा, अल्का क्षीरसागर, भारती डे, कल्पना गुर्जर, विद्या पटेल, राखीव 1 : रिचा श्रीराम, मीनल ठाकुर, प्रशिक्षक : अनल शहा.









