सीएची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर आधारित कहाणी
बहुतांश लोक इंजिनियरिंग आणि वैद्यकीय शिक्षणाला सर्वात अवघड ठरवत असतात. परंतु आणखी एका परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी विद्यार्थी दिवसरात्र मेहनत करत असतात. चार्टर्ड अकौंटंट होणे देखील अत्यंत कठिण असते. अमेझॉन मिनी टीव्हीने या क्षेत्राशी निगडित एका वेबसीरिजची घोषणा केली आहे.

या वेबसीरिजचे नाव ‘हाफ सीए’ असून यात सीएची तयारी करणे सोपे नसल्याचे दाखवून दिले जाणार आहे. जगातील सर्वात अवघड प्रोफेशनकल कोर्सेसपैकी एक सीएची तयारी करण्यापासून अंतिम परीक्षेपर्यंत पोहोचण्यापर्यंतचा विद्यार्थ्यांचा प्रवास दाखविला जाणार आहे. ‘स्वत:च्या नावासमोर सीए लावणे अत्यंत जितकी चांगली फीलिंग आहे, हा प्रवास पूर्ण करणे तितकेच अवघड आहे, सर्वात अवघड अन् देशातील सर्वात नॉन-रिवॉर्ड कोर्स चार्टर्ड अकौंटंटमध्ये तुमचे स्वागत आहे’ असे अमेझॉन मिनी टीव्हीकडून सादर व्हिडिओत म्हटले गेले आहे.
ही सीरिज प्रेक्षकांना मोफत पाहता येणार आहे. या सीरिजमध्ये अहसास चन्ना, प्रीत कमानी, ज्ञानेंद्र त्रिपाठी, अनमोल कजानी आणि रोहन जोशी यासारखे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. द व्हायरल फीव्हरकडू निर्मिती ‘हाफ सीए’चे दिग्दर्शन प्रतीश मेहता करणार आहेत. याची कहाणी हरीश पेद्दिन्ती, सीए खुशबू बैद, तत्सत पांडे यांनी लिहिली आहे.









