मोफत वीजेसह महिलांना दरमहा 1000 देण्याचे आश्वासन
वृत्तसंस्था /पंचकुला
हरियाणातील विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी ताकद लावली असतानाच आम आदमी पक्षानेही आगामी निवडणुका स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतला आहे. आता ‘आप’नेही निवडणुकीची तयारी गतिमान करत शनिवारी हमीपत्र जाहीर केले. पक्षाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या हा हमीपत्रात मोफत वीज देण्याबरोबरच महिलांना प्रतिमहिना 1,000 रुपये देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांनी हरियाणा विधानसभा निवडणुकीपूर्वी पाच हमी योजना जाहीर केल्या आहेत. आम आदमी पार्टीने हरियाणातील जनतेला मोफत आणि 24 तास वीज, मोफत उपचार, मोफत शिक्षण, सर्व माता-भगिनींना दरमहा 1000 ऊपये आणि प्रत्येक तऊणाला रोजगार देण्याचे आश्वासन दिले आहे. पंजाब आणि दिल्लीतील योजनांप्रमाणेच आम आदमी पक्षाकडून हरियाणातील जनतेसाठी वेगवेगळ्या आश्वासनांची खैरात विधानसभा निवडणुकीपूर्वी करण्यात आली आहे.









