13 जूनला विधानसभेचे आमदार करणार मतदान
प्रतिनिधी/ बेंगळूर
पुढील महिन्यात रिक्त होणाऱ्या विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी निवडणूक घोषणा करण्यात आली आहे. 13 जून रोजी मतदान होणार असून त्याच दिवशी सायंकाळी मतमोजणी करून निकाल जाहीर केला जाणार आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने सोमवारी विधानसभेवरून विधानपरिषदेसाठी होणाऱ्या निवडणुकीची घोषणा केली आहे. त्यानुसार निवडणुकीसाठी 27 मे रोजी अधिसूचना जारी होणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी 3 जून शेवटचा दिवस आहे. 4 जून रोजी अर्ज छाननी होणार असून माघार घेण्यासाठी 6 जून शेवटचा दिवस आहे.
विधानसभेवरून विधानपरिषदेवर निवडून आलेले अरविंदकुमार अरळी, एन. एस. बोसराजू, के. गोविंदराज, डॉ. तेजस्विनीगौडा, मुनिराजूगौडा पी. एम., के. पी. नेजुंडी, बी. एम. फारुक, रघुनाथराव मलकापुरे, एन. रविकुमार, एस. रुद्रेगौडा, के. हरिषकुमार या 11 सदस्यांचा कार्यकाळ 17 जून रोजी संपणार आहे.









