ऑनलाईन टीम / तरुण भारत :
शिक्षक दिनानिमित्त पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान (Bhagwant Mann) यांनी शिक्षकांना मोठी भेट दिली आहे. राज्यातील सर्व महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये विद्यापीठ अनुदान आयोगाचा सातवा वेतन आयोग 1 ऑक्टोबरपासून लागू करणार असल्याची घोषणा त्यांनी केली.
भगवंत मान यांनी आज शिक्षक दिनानिमित्त एका व्हिडिओ संदेशातून शिक्षकांना शुभेच्छा दिल्या. त्यावेळी त्यांनी ही घोषणा केली. मान म्हणाले, 1 ऑक्टोबर 2022 पासून राज्यातील सर्व महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये सातवा वेतन आयोग लागू होणार आहे. तसेच लवकरच महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये अतिथी प्राध्यापकांचीही भरती केली जाईल. त्यामुळे शिक्षकांची कमतरता दूर होईल. जुन्या कंत्राटी अतिथी प्राध्यापकांच्या मानधनातही वाढ करण्यात आली आहे. याबाबतची अधिसूचना लवकरच काढण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.
अधिक वाचा : मुंबईवर भाजपचेच वर्चस्व पाहिजे; अमित शाह गरजले









