दहा दिवसात गर्दीने मोडला उच्चांक : उत्कृष्ट स्टॉलधारकांना बक्षीस देऊन गौरविले
बेळगाव : रोटरी क्लब बेळगाव आयोजित अन्नोत्सवाची रविवार दि. 14 रोजी यशस्वी सांगता झाली. गेले दहा दिवस सीपीएड मैदानावर सुरू असलेल्या अन्नोत्सवमध्ये यंदा गर्दीने उच्चांक मोडला. शनिवारी झालेल्या सुपर वुमन स्पर्धेवेळी असंख्य नागरिकांनी उपस्थित राहून या स्पर्धेचा आनंद घेतला. रविवारच्या सुटीचे औचित्य साधून बहुसंख्य कुटुंबीयांनी आपल्या मुलांसमवेत अन्नोत्सवाच्या ठिकाणी येऊन त्यांना मनोरंजनाच्या खेळात सहभागी होऊ दिले. रोटरी क्लब बेळगावचे अध्यक्ष जयदीप सिद्दण्णावर, सचिव मनोज मायकेल व अन्य सर्व पदाधिकारी तसेच रोटरी क्लबच्या अन्य सदस्यांनी हा महोत्सव यशस्वी केला. महोत्सवात सहभागी झालेल्या स्टॉलधारकांमधून उत्कृष्ट स्टॉलधारक तसेच वेगवेगळ्या निकषांवर उत्कृष्ट स्टॉलधारक निवडण्यात आले.
त्यांचा तपशील पुढीलप्रमाणे- बेस्ट व्हेज अमॅच्युअर- कास्ट्री डेझर्ट्स अँड केक्स (स्टॉल नं. 76), बेस्ट व्हेज प्रोफेशनल- सडा पंजाब (स्टॉल नं. 2), बेस्ट डेकोरेटेड स्टॉल- गार्डन कोर्ट (स्टॉल नं. 1), बेस्ट नॉनव्हेज अमॅच्युअर- कोंबडी वडे (स्टॉल नं. 5), बेस्ट नॉनव्हेज प्रोफेशनल- शफीकभाई लाहोरी (स्टॉल क्र. 3), बेस्ट आऊटसाईड व्हेज स्टॉल- हिमाचली सिद्धू/फ्रूट आइस्क्रीम (स्टॉल नं. 9), बेस्ट आऊटसाईड नॉनव्हेज स्टॉल- गेट द टेस्ट ऑफ वाझवान कुझिन ऑफ काश्मीर (स्टॉल क्र. 2), बेस्ट कंझ्युमर स्टॉल- पुष्पम टेक्स्टोरियम (स्टॉल क्र. 43, 44), बेस्ट आऊटसाईड व्हेज स्टॉल- हिमाचली-मनाली सिद्धू/फ्रूट आइस्क्रीम (स्टॉल क्र. 9).









