मिळालेल्या प्रतिसादाबद्दल संयोजकांनी मानले खाद्यप्रेमींचे आभार
बेळगाव : रोटरी अन्नोत्सवाला यावर्षी तुफान प्रतिसाद मिळाला. मागील आठवडाभरात 1 लाख 80 हजारहून अधिक खाद्यप्रेमींनी अन्नोत्सवाला भेट दिली. मंगळवारी झालेल्या सांगता समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून घोडावत उद्योग समुहाचे चेअरमन डॉ. संजय घोडावत तसेच अरिहंत हॉस्पिटलचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. महादेव दीक्षित उपस्थित होते. रोटरी क्लब ऑफ बेळगावचे अध्यक्ष सुहास चांडक यांनी अन्नोत्सवाबद्दल माहिती दिली. सेक्रेटरी मनीषा हेरेकर यांनी यावर्षी मिळालेल्या प्रतिसादाबद्दल खाद्यप्रेमींचे आभार मानले. इव्हेंट चेअरमन अक्षय कुलकर्णी व शैलेश मांगले यांनी सर्व स्टॉलधारकांचे आभार मानले. अन्नोत्सवाच्या टायटल
स्पॉन्सरर बीईंग ह्युमनच्या फ्रांचायजी पार्टनर प्रियांका कुलकर्णी यांचेही आभार मानण्यात आले. अन्नोत्सवमधील सहभागी स्टॉलधारकांचाही सत्कार करण्यात आला. बेस्ट अमॅच्युअर स्टॉल म्हणून ‘पोरवाल खाऊकट्टा’, बेस्ट व्हेज प्रोफेशनल स्टॉल- ‘नेटिव्ह’, बेस्ट नॉनव्हेज अमॅच्युअर स्टॉल- ‘कोकोनट’, बेस्ट नॉनव्हेज प्रोफेशनल स्टॉल- ‘कॅम्प फ्रेंड्स कॉर्नर’, बेस्ट कंझ्युमर स्टॉल- ‘नॅचरल फौंटन’, बेस्ट आऊटसाईड व्हेज स्टॉल- ‘दावणगेरे बेन्ने डोसा’, बेस्ट आऊटसाईड नॉनव्हेज स्टॉल- ‘दरबार’ यांना मिळाला. या कार्यक्रमात ‘बेळगाव क्रिएटर’ यांचाही सत्कार झाला. यामध्ये प्रथम क्रमांक मिथाली, आदित्य, रिभव, द्वितीय जुनेद, नेमेद, जुनेद एस., क्षितीज, तृतीय समीक्षा पाटील यांनी मिळविला.









