कुंभारजुवे : माझ्या मतदारसंघातली स्त्राr शक्ती स्वाभिमानी व स्वत:च्या पायावर उभी करून तीचा सहभाग तीच्या संसारात व्हावा हे माझे मुख्य ध्येय आहे त्यामध्ये कुठला धर्म, जात, पंथ आडवा येणार नाही याची दक्षता मी स्वत घेईन हा माझा शब्द आहे. कारण स्वयपुर्ण महिला आपल्या कुटुंबाची संस्कारमय काळजी घेऊ शकते. निवडणूकीच्या प्रसंगी काही ऊपये देऊन त्या प्रलोभनांना बळी पडणारी स्त्राr शक्ती मला संपवायची आहे. त्यासाठी तुमचे नी माझे पुर्ण सहकार्य हा सेतू होणे आवश्यक आहे असे उदगार कला आणि संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांनी काढले.
माशेल येथे खाडोळा येथील श्रमशक्ती स्वय सहाय्य गटाच्या वधॉपन दिनाप्रित्यर्थ कला आणि संस्कृती खाते यांच्या सहकार्याने आयोजित रंगभरी सांज कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून कला आणि संस्कृती मंत्री गोविंद गावडे नोनु व्हिलेज मध्ये बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर खास निमंत्रीत म्हणून जिल्हा पंचायत सदस्य श्रमेश भोसले, माशेलचे सरपंच जयेश नाईक, फोडा गटाच्या शिल्पा होन्नाकर, सेवानिवृत्त प्राचार्य गोविंद वळवईकर, श्रम शक्ती स्वय सहाय्य गटाच्या अध्यक्ष अपुर्वा भोसले, तसेच प्रिया नावेकर आदी मान्यवर उपस्थित होते. प्रमुख पाहुणे कला आणि संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांनी समई प्रज्वलित करून उदघाटन केले. स्वागत व प्रास्ताविक अपुर्वा भोसले हीनै केले मान्यवरांचे झाडांचे रोपटे देऊन विद्या तारी, सुषमा देशपांडे, दिपा सावंत, शबनम खान, पिंगल परब, आयेशा नाईक, स्नेहल सावंत शांती फडते यांनी स्वागत केले. शिल्पा होन्नाकर हिने स्वय सहाय्य गटांची विविध प्रकारची माहिती दिली. महीलांना बचत ची सवय संसारात असते स्वय सहाय्य गटाच्या माध्यमातून त्यांना वेगळे बळ मिळते. आमच्या स्थानिक आमदार तथा कला आणि संस्कृती मंत्री गोविंद गावडे याकामी पुर्ण सहकार्य करीत असतात असे उदगार जिल्हा पंचायत सदस्य श्रमेश भोसले यांनी काढले. स्वय सहाय्य गटाच्या सदस्यांनी हे ध्यानात ठेवले पाहिजे की आपल्या गटाला मदत कऊन त्यांना सक्षम करण्यार्याबरोबर सदैव खंबीर उभे राहणे त्यांचे कर्तव्य असते ते त्यांनी पार पाडले पाहीजे असे आवाहन सरपंच जयेश नाईक यांनी केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दर्शना सावंत व आभार अव्यक्ता भोसले हीने मानले यानंतर महिलांचा सांस्कृतिक कार्यक्रम झाला.









