
बेळगाव : राणी चन्नम्मानगर येथील श्री गणेश व मारुती मंदिराचा वर्धापनदिन 3 मे रोजी अक्षय्य तृतीयेला साजरा करण्यात आला. त्यानिमित्त सकाळी 8.30 पासून कार्यक्रम पार पडला. गणेश होम, पंचामृत, अभिषेक, श्री सत्यनारायण पूजा, श्री सत्यविनायक पूजा झाली. पौरोहित्य दीनानाथ कुलकर्णी यांनी केले. दुपारी 1 ते 4 या वेळेत झालेल्या महाप्रसादाचा शेकडो भाविकांनी लाभ घेतला. सायंकाळी महिलांचा भजनाचा कार्यक्रम झाला. याचवेळेत हळदीकुंकूचा कार्यक्रम पार पडला. 7.30 वाजता महामंगलारती व मंत्रपुष्प करण्यात आले. यावेळी भाविक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.









