प्रसिद्ध लेख, अभिनेते आणि दिग्दर्शक अभिराम भडकमकर प्रमुख वक्ते
प्रतिनिधी/पणजी
गोवा मराठी अकादमीचा सहावा वर्धापनदिन समारंभ सोमवार दि. 30 रोजी सायं. 4 वा. पणजी येथील इन्स्टिटय़ूट मिनेझीस ब्रागांझा सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात प्रसिद्ध लेखक, अभिनेते आणि दिग्दर्शक अभिराम भडकमकर प्रमुख वक्ते या नात्याने उपस्थित राहणार आहेत.
नायक, चित्रपट, पटकथा आणि साहित्याच्या क्षेत्रात प्रदीर्घ अनुभव असलेल्या अभिराम भडकमकरांचे विचार ऐकण्याची संधी वर्धापनदिन समारंभात सर्वांना लाभणार असून या वर्षाचे अकादमीचे साहित्य पुरस्कार लाभलेल्या गोमंतकीय साहित्यिकांचा, मराठीसाठी विशेष योगदान देणाऱया कार्यकर्त्यांचा आणि विविध पारितोषिके प्राप्त केलेल्या सर्वांचा सन्मान त्यांच्याहस्ते होणार आहे. या समारंभात ‘प्रेम वरदान’ हा नाटय़संगीताचा विशेष कार्यक्रम सादर केला जणार असून त्यात अनुष्का थळी, सूरज शेटगावकर, शारदा शेटकर व दिव्या गावणेकर सहभागी होतील. त्यांना ऑर्गनवर शिवानंद दाभोलकर आणि तबल्यावर नितीन कोरगावकर संगीतसाथ करतील. गोमंतकातील मराठी प्रेमींनी या वर्धापनदिन समारंभात मोठय़ा संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन अकादमीचे अध्यक्ष अनिल सामंत यांनी केले आहे.









