Sangli News : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती च्या स्थापनेपासून डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचे सहकारी राहिलेले प्रा.प.रा.आर्डे यांचे शुक्रवारी पहाटे ५.३० वाजता अल्पशा आजाराने भारती हॉस्पिटल सांगली येथे निधन झाले.ते ८२ वर्षाचे होते. त्यांच्या इच्छेनुसार मृत्यू पश्चात कोणतेही धार्मिक विधी न करता भारती हॉस्पिटलला देहदान केले गेले.
प्रा.आर्डे यांनी फिजिक्सचे विद्यार्थीप्रिय अध्यापक म्हणून ३२ वर्ष रयत शिक्षण संस्थेत सेवा केली होती.डॉ.नरेंद्र दाभोलकर यांनी सातारा येथे अंनिसच्या कार्याला सुरुवात केली.सेवानिवृत्त नंतर त्यांनी पूर्णवेळ अंनिसच्या कामाला वाहून घेतले होते.त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र या मासिकाचे १९ वर्षे संपादक म्हणून काम पाहिले.
प्रा.आर्डे यांनी खगोलशास्त्र,विवेकवाद,वैज्ञानिक दृष्टिकोन,आत्मा पुर्नजन्म,प्लॅन्चेट,मुलांसाठी सोप्या भाषेत हसत खेळत विज्ञान या विषयावर पुस्तके लिहली आहेत. छद्मविज्ञान या विषयावर त्यांचा विशेष अभ्यास होता.त्यांच्या पुस्तकांना राज्य शासनाचे तसेच अनेक संस्थांचे पुरस्कार मिळाले आहेत.
प्रा.आर्डे यांना महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरविले होते.त्यांना मराठा समाज सांगली, पी.डी.पाटील कराड गौरव पुरस्कार सह अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी उषाताई, मुलगा विनय, मुलगी रुपा, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
Previous Articleपुण्यात ‘सेक्सटॉर्शन’चा दुसरा बळी
Abhijeet Khandekar
Meet Abhijeet Khandekar : a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. With a Master's degree in Journalism from Shivaji University, Abhijeet specializes in political news, entertainment, and local content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives. Connect with Abhijeet for collaborations and captivating content that informs and entertains.