कसबा बीड,प्रतिनिधी
कायदा व सुव्यवस्थापन ची माहिती शालेय जीवनापासून विद्यार्थ्यांना असणे गरजेचे आहे असे करवीर सहा.पोलीस अधीक्षक श्रीमती अन्नपूर्णा सिंह यांनी आज करवीर पोलीस स्टेशन परिसरात शालेय विद्यार्थी भेट व वृक्षारोपण कार्यक्रमानिमित्त संपन्न झालेल्या कार्यक्रमात आपल्या मनोगतात सांगितले.आज करवीर पोलिस हद्दीत प्रायव्हेट मराठी रजिस्टर स्कूल, (पी. एम. आर.) कसबा बीड तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर या शाळेचे करवीर पोलीस ठाणे भेटीचे आयोजन करण्यात आले होते त्याप्रसंगी त्या बोलत होत्या.
प्रथम पोलीस ठाण्यास भेट देण्यासाठी आलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत गुलाब पुष्प देऊन करण्यात आले.त्यानंतर त्यांच्याशी मनमोकळे पणाने गप्पा मारून त्यांच्या आवडीनिवडी विचारून घेतल . आपण विद्यार्थी या देशाचे भवितव्य आहात याकरिता आपण सुजग व सुजाण नागरिक म्हणून आपली कर्तव्य पार पाडली पाहिजेत. पोलिसांबद्दल मनामध्ये अनाहुत भीती न बाळगता आपल्याला कोणत्याही प्रकारची अडचण असल्यास, अनुचित प्रकार निदर्शनास आल्यास 112 या क्रमांकावरती कॉल करणे बाबत सांगितले, आपल्या परीने अनेक प्रश्न विचारले त्याची उत्तरे देखील त्यांना त्यांच्या भाषेत दिली.
विद्यार्थ्यांनी पोलीस ठाणे समोरील आवारात पोलिसां समवेत वृक्षारोपण केले, यावेळी त्यांचा उत्साह वाखणण्याजोगा होता.पोलीस ठाणे कडील अंमलदार यांनी पोलीस दलाची रचना, कार्य पद्धती, ठाणे अंमलदार-गुन्हे तक्रारी कशाप्रकारे दाखल केल्या जातात, सीसीटीएनएस यंत्रणा-कार्यपद्धती बीट, तपासी अंमलदार- गुन्हे तपास, पोलीस निरीक्षक कक्ष-,गुन्हे शोध पथक, कारकून-विभागाची कामे, हत्यार, दारूगोळा, शस्त्रांविषयी माहिती गोपनीय-पासपोर्ट ,चारित्र्य पडताळणी इतर माहिती, तसेच हजेरी मेजर, बारनिशी, क्राईम विभाग,याची सर्व विभागवार माहिती मुलांना समजावून सांगितली, पोलीस स्टेशन कडील डायल 112, बिनतारी संदेश यंत्रणा देखील कसे काम करतात याचे प्रात्यक्षिक मुलांनी स्वतः पाहिले. होमगार्ड,पोलीस अंमलदार, पोलीस पाटील यांची माहिती दिली.
विद्यार्थ्यांनी शालेय जीवनात, भावी आयुष्यात कोणत्या गोष्टी कराव्यात, कोणत्या करू नयेत, याबाबतीत सूचना देऊन लहान मुलांविषयी होणारे गुन्हे, वाहतुकीचे नियमन, व्यसनाधीनता, मोबाईल ,सोशल मीडिया अतिवापर, ऑनलाइन फसवणूक, सायबर गुन्हे , ध्वनी प्रदूषण , पोलीस- जनता संबंध याबाबत चर्चा करून असे प्रकार घडू नयेत म्हणून घ्यावयाची सुरक्षितता, दक्षता प्रतिबंधक उपाययोजना बाबत मार्गदर्शन करण्यात आले.
विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी पोलीस स्टेशन भेटीपूर्वी व भेटीनंतर च्या भावना व्यक्त करून पोलीस दलाच्या या उपक्रमाचे कौतुक करून मुलांना समजेल अशा दिलेल्या माहिती बाबत आभार व्यक्त केले व शुभेच्छा दिल्या.
यावेळी सहा. पोलसती अन्नपूर्णा सिंह परि. सहा. पोलीस अधीक्षक, अविनाश पोवार, सुहास पवार गोपनीय पोलीस हेड कॉन्स्टेबल , सरवडेकर, पोलीस हेड कॉन्स्टेबल, अमित जाधव पोलीस कॉन्स्टेबल गुन्हे शोध पथक, घाटगे,पोलीस हेडकॉन्स्टेबल, श्रीमती श्रुती कांबळे पोलीस कॉन्स्टेबल -कारकून, भिवटे-ठाणे अंमलदार, पसारे मॅडम पोलीस हवालदार -संगणक कक्ष ,प्रियांका साबळे, रेखा माने -हजेरी मेजर, बारनिशी ,बीट अंमलदार-पोलीस हवालदार राजू पाटील, दत्तात्रय बांगर आदी स्टाफ. कसबा बीड पोलीस पाटील पंढरीनाथ ताशिलदार , पीएमआर शालेचे प्रमुख सचिन वरुटे, शिक्षक व विद्यार्थी आदी उपस्थित होते.