सांगरूळ, वार्ताहर
Kolhapur : सांगरूळमध्ये विविध धार्मिक सण आणि उत्सव सर्वधर्मीय नागरिक एकत्रितपणे साजरे करतात .कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सांगरूळ येथील मोहरम मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. येथील हिंदू मुस्लिम ऐक्य आदर्शवत आहे. परंपरागत शांततेत साजरा होणारा मोहरम या वर्षीही चांगल्या प्रकारे पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासनाचे सहकार्य राहील अशी ग्वाही, कोल्हापूरच्या परिविक्षाधिन सहाय्यक पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह यांनी दिली.सांगरूळ येथील मोहरम शांततेत पार पडण्यासाठी सांगरूळ ग्रामपंचायतमध्ये आयोजित बैठकीत त्याबोलत होत्या. अध्यक्षस्थानी लोकनियुक्त सरपंच शितल खाडे होत्या.
यावेळी बोलताना अन्नपूर्णा सिंह यांनी मोहरम सनानिमित्त कोणत्याही पद्धतीचे जातीय तेढ निर्माण होऊ नये याची खबरदारी ग्रामपंचायत प्रशासनाने घ्यावी . मिरवणुकांमध्ये डॉल्बी सारख्या धनु प्रदूषण करणाऱ्या साधनांचा वापर होणार नाही याची दक्षता घ्यावी.पोलीस प्रशासनही यामध्ये सहकार्य करेल अशी ग्वाही दिली .स्वागत व प्रास्ताविक ग्रामविकास अधिकारी अमोल काजवे यांनी केले .हजरत पीर मशीद सांगरूळचे ट्रस्टी फैजुला मुल्ला यांनी सांगरुळच्या मोहरम मधिल दैनंदिन सर्व धार्मिक कार्यक्रमाची माहिती दिली.
यावेळी बोलताना शितल खाडे म्हणाल्या , सांगरूळमध्ये शेकडो वर्षापासून मोहरमचा सण हिंदू व मुस्लिम समाजातील सर्व लोक एकत्रितपणे श्रद्धेने साजरा करतात . सणांमध्ये कधीही जातीय तेढ अगर इतर कोणत्याही कारणावरून वादावादी आज पर्यंत तरी झालेली नाही.पूर्वीपासूनच ग्रामस्थांची श्रद्धा असल्याने संपूर्ण मोहरम सण शांततेने साजरा होतो असे सांगितल. मोहरम बरोबरच इतर हिंदू धर्माचे सणही येथील हिंदू मुस्लिमासह इतर सर्व धर्माचे लोक एकत्रितपणे मोठ्या उत्साहात साजरा करत असल्याचे सांगितले.
यावेळी पंचायत समितीच्या सदस्या अर्चना खाडे, ग्रामपंचायत सदस्य सचिन नाळे, बाळासो खाडे, उज्वला लोंढे, सुरेखा तोरस्कर, अश्विनी यादव, विद्या चाबूक, साक्षी म्हेतर, मधुरा खाडे, रेषा आंबी, सचिन लोंढे, संभाजी तोरस्कर, संभाजी यादव यांचेसह ग्रामस्थ व ग्रामपंचायतचे कर्मचारी उपस्थित होते.उपसरपंच सुभाष सुतार यांनी आभार मानले .
बैठकीनंतर अन्नपूर्णा सिंह यांनी सांगरूळ ग्रामपंचायत कार्यालय परिसराची पहाणी केली आणि सांगरूळ येथील हजरत फिर मशीद मध्ये भेट देऊन तेथील ट्रस्टींकडून परंपरागत सुरू असणाऱ्या मोहरम बाबत माहिती घेतली.सांगरूळचे ग्रामदैवत जोतिबा देवालयाला भेट दिली .









