महालक्ष्मी ट्रस्टचे नियोजन; अंबाबाई मंदिर परिसरात बसणार नवे सीसीटीव्ही, अत्याधुनिक एलईडी क्रीन
कोल्हापूर प्रतिनिधी
शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त 15 ते 24 ऑक्टोबर या कालावधीत करवीर निवासिनी अंबाबाईच्या दर्शनासाठी परगावाहून येणाऱ्या भाविकांसाठी महालक्ष्मी अन्नछत्र सेवा ट्रस्टने खाण्यापिण्याची व्यवस्था केली आहे. संपूर्ण उत्सव काळात रोज 12 हजारांहून अधिक भाविक ट्रस्टच्या नित्त अन्नछत्रातील भोजनाचा लाभ घेऊ शकतील, असे नियोजन केले आहे. रोज सकाळी 11 वाजता सुऊ केले जाणारे अन्नछत्र दुपारी 4 पर्यंत सुऊ राहणार आहे, तेव्हा भाविकांनी अन्नछत्राचा लाभ घ्यावा, असे आवाहन अन्नछत्र ट्रस्टचे अध्यक्ष राजू मेवेकरी यांनी केले आहे.
दरम्यान, अंबाबाई मंदिरात साजरा केल्या जाणाऱ्या नवरात्र उत्सवाची पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीकडून सुऊ असलेली तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे. मंदिर व परिसरावर वॉच ठेवण्यासाठी सध्या 85 सीसीटीव्ही कॅमेरे सक्रीय आहेत. आता या कॅमेऱ्यांमध्ये 15 ते 20 नवीन कॅमेऱ्यांची भर पडणार आहे. हे नवे कॅमेरे तुळजा भवानी मंदिरासमोरील पागा बिल्डिंग, शेतकरी संघ कार्यालयातील दर्शन रांगेसह अन्य गरजेच्या ठिकाणी लावले जाणार आहेत.
मंदिर स्वच्छतेसाठी 52 जणांचा राबता…
महापालिकेच्या पाण्याच्या बुम गाडीने अंबाबाई मंदिराचा पूर्व व घाटी दरवाजा मंगळवारी स्वच्छत करण्यात आला. तसेच मुंबईतील आय स्मार्ट फॅसिटेक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने गेली 3 दिवस अखंड परिश्रम घेऊन मंदिराच्या संपूर्ण बाह्यांगाची वॉटर जेट गनच्या साहाय्याने स्वच्छता केली. मंदिर स्वच्छता कामासाठी देवस्थान समितीचे 30 व आय स्मार्ट कंपनीचे 22 कर्मचारी गेल्या सहा दिवसांपासून परीश्रम घेत आहेत.
ललिता पंचमीदिनी मोफत बससेवा…
येत्या 19 ऑक्टोबरला टेंबलाई टेकडीवरील टेंबलाई मंदिरात ललिता पंचमीचा सोहळा साजरा होत आहे. या सोहळ्याला जास्तीत जास्ती भाविकांना जाता यावे, यासाठी महालक्ष्मी अन्नछत्र सेवा ट्रस्टकडून मोफत बससेवेची व्यवस्था केली जाणार आहे. बिंदू चौकातून सर्व बसेस टेंबलाई टेकडीकडे सोडल्या जाणार आहेत. सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत ही बससेवा सुऊ राहणार आहे.
चार ठिकाणी कायमस्वऊपीत एलईडी क्रीन…
नवरात्र उत्सवाचे औचित्य साधून देवस्थान समितीच्यावतीने गर्दी होणाऱ्या चार ठिकाणी कायम स्वऊपी अत्याधुनिक एलईडी क्रीन लावल्या जाणार आहेत. बिंदू चौक, भक्तीसेवी विद्यापीठ, अंबाबाई मंदिर घाटी दरवाजा आणि अंबाबाई मंदिरांचा व्हरांडा अशी क्रीन लावली जाणारी ठिकाणे आहेत. या प्रत्येक ठिकाणी लावल्या जाणाऱ्या क्रीनचा आकार 8 फुट उंच व 12 फुट ऊंद इतका असणार आहे. या सर्व क्रीन खरेदीसाठी माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्याकडून विशेष निधी मंजूर करण्यात आला होता. या निधीतून चार क्रीन खरेदी केल्या असून त्या लावण्याचे काम सध्या सुऊ आहे.
जुना राजवाड्याच्या नगारखान्याची शुक्रवारी स्वच्छता…
करवीर निवासिनी अंबाबाईइतकेच महत्व असलेल्या तुळजा भवानी मंदिरातील देवीच्या उत्सावाचीही तयारी जोरात सुऊ आहे. मंगळवारी संयोगिताराजे छत्रपती यांनी तुळजा भवानी मंदिर व जुना राजवाड्याच्या नगारखान्याची पाहणी कऊन छत्रपती चॅरीटेबल देवस्थान स्ट्रटच्या पदाधिकाऱ्यांना सुचना केल्या. त्यांनीच केलेल्या सुचनेनुसार शुक्रवारी 13 रोजीपासून नगारखाना, भवानी मंडप व परिसराची पाण्याने स्वच्छता केली जाणार आहे. सध्या कारागिरांकडून तुळजा भवानीदेवीच्या नित्यपूजेतील सोन्या-चांदीच्या वस्तूंसह चांदीची पालखी, चवरी, मोरचेलसह विविध प्रकारच्या दागिन्यांची स्वच्छता केली जात आहे.









