कोल्हापुरात साखर-पेढे वाटून आनंदोत्सव
प्रतिनिधी/कोल्हापूर
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे हे भारतीय साहित्य क्षेत्रातील अतुलणीय व्यक्तीमत्व आहे. याची दखल घेवून रशियाच्या राजधानीमध्ये म्हणजे मास्कोमध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. ही भारतासाठी अभिमानास्पद व महत्त्वपूर्ण घटना आहे. रशियाने केलेल्या अण्णाभाऊंच्या सन्मानाबद्दल कोल्हापुरात साखर-पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला.
अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य समाजाला, कष्टकऱयांना दिशा देणारे आहे. त्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या लढयात आपल्या लिखानातून केलेली जनजागृती आणि काव्यातून क्रांतीकारकांना दिलेला संदेश देशहितासाठी महत्वाचा मानला जातो. त्यांनी सुमारे 16 कथासंग्रह आणि 32 पेक्षा अधिक कादंबऱया लिहिल्या. त्यांच्या एकूण 9 कादंबरीवर चित्रपटांची निर्मिती झाली आहे. याची रशियाने दखल घेवून त्यांचा पुतळा बसवला आहे. रशियाच्या या निर्णयाचे स्वागत करीत अण्णाभाऊ साठे प्रेमींनी एकत्र येत साखर-पेढे वाटून आनंद साजरा केला. यावेळी अनिल म्हमाणे, अमोल महापुरे, विशाल देवकुळे, प्रशांत आवळे, अनिल मिसाळ, चेतन मस्के, संजय धोंगडे, अशोक भंडारे, संभाजी आवळे, अविनाश कांबण्s आदी उपस्थित होते.









