ओटवणे | प्रतिनिधी
ओटवणे येथील रवळनाथ देवस्थानचे मानकरी बापू उर्फ अण्णा सदू गावकर – मळेकर (८२) यांचे गुरुवारी रात्री निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. रात्री उशिरा त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. गावच्या धार्मिक कार्यात त्यांचा सक्रिय सहभाग असायचा. तीन आठवड्यापूर्वीच ३० जुलै रोजी त्यांच्या पत्नी सौ सत्यवती गावकर यांचे निधन झाले होते. त्यांच्या पश्चात चार मुलगे, सुना, पुतणे, नातवंडे असा परिवार आहे. येथील टेम्पो चालक बाबा मळेकर, गवंडी कारागीर राजन गावकर, ओटवणे हायस्कूलचे कर्मचारी मंगेश गावकर, चंद्रकांत गावकर यांचे ते वडील होत. ग्रामपंचायत सदस्य सौ मनाली गावकर यांचे ते सासरे तर सावंतवाडी येथील पत्रकार सिताराम गावडे यांचे ते मावसे होत.









