मालवण / प्रतिनिधी
स . का . पाटील सिंधुदुर्ग कॉलेज एनसीसी विभागाचे प्रमुख तसेच व्यावसायिक अर्थशास्त्र विभागाचे प्रमुख असोसिएट एनसीसी ऑफिसर प्राध्यापक लेफ्टनंट प्रा डॉ एम आर खोत यांना सत्यशोधक अण्णाभाऊ साठे परिषद महाराष्ट्र यांच्यावतीने अण्णाभाऊ साठे समाजभूषण पुरस्कार देण्यात आला.
प्राध्यापक एम आर खोत मुळगाव कोगनोळी कागल हे असून हे एका शेतकरी कुटुंबातील आहेत .लहानपणापासून शेती कामे करीत बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण केले त्यानंतर कोल्हापूर या ठिकाणी एका बुलडोजर कंपनीत क्लार्क आणि मॅनेजर म्हणून काम करीत असताना B.A., M.A.,, M.Phil. Ph.D . आणि GDC & A . अशा पदव्या प्राप्त केल्या. बी ए नंतर विवाह होऊन देखील शिक्षणाची आवड असल्यामुळे शिक्षणात सातत्य ठेवण्याचे काम त्यांनी केले . पीएचडी करत असताना शहाजी कॉलेज व महावीर कॉलेज कोल्हापूर या ठिकाणी तासिका तत्त्वावर बुलडोझर कंपनीतील नोकरी सांभाळत शिकवण्याची काम केले. त्यानंतर एचडी झाल्यानंतर मालवण मधील सिंधुदुर्ग कॉलेजवर सहाय्यक प्राध्यापक म्हणून रुजू झाले. कॉलेजला जॉईन झाल्यानंतर त्यांनी असोसिएट एनसीसी ऑफिसर pre. commissioner army course हा तीन महिन्याचा आर्मी कोर्स भारताचे मध्यवर्ती ट्रेनिंग सेंटर नागपूर कामठी या ठिकाणी पूर्ण केला. त्यांना लेफ्टनंट ही पद प्राप्त झाले . त्याचबरोबर अलीकडच्या काळात त्यांनी MBA (ह्यूमन रिसोर्स मॅनेजमेंट) हा अभ्यासक्रम देखील पूर्ण केलेला आहे. तसेच चालू वर्षी फेब्रुवारी महिन्यात पुन्हा एक महिन्याचा आर्मी कोर्स पूर्ण करून आलेले आहेत . मुंबई युनिव्हर्सिटी व कॉलेज या ठिकाणी विविध कमिटींवर काम करतात . शिक्षण दानाचे काम करत असताना सामाजिक कार्याची आवड देखील त्यांना आहे. स्वतः व एनसीसीच्या माध्यमातून मालवण पोलीस स्टेशन, मालवण तहसील कार्यालय, मालवण नगरपालिका, कलेक्टर ऑफिस सिंधुदुर्ग तसेच मालवण मधील इतर सामाजिक कार्यात ते सातत्याने सहभागी होत असतात. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे चे कलेक्टर मंजू लक्ष्मी यांनी त्यांना आपदा मित्र प्रशिक्षण मध्ये सिंधुदुर्ग जिल्हा पहिल्या क्रमांकावर नेण्यास मदत केल्याबद्दल प्रशस्तीपत्र दिलेली आहे. कोल्हापूर या ठिकाणी देखील आपल्या मूळ गावी वेगवेगळ्या सामाजिक कार्यात ते सातत्याने सहभागी असतात. या सर्व गोष्टींचा विचार करून सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत असल्यामुळे त्यांना हा अण्णाभाऊ साठे समाजभूषण पुरस्कार जाहीर झालेला आहे. हा पुरस्कार सोहळा राज्यश्री शाहू सांस्कृतिक भवन दसरा चौक कोल्हापूर या ठिकाणी मान्यवरांच्या उपस्थित पार पडला









