वृत्तसंस्था/ लियुव्हेन (बेल्जियम)
भारताची 17 वर्षीय महिला बॅडमिंटनपटू अनमोल खर्रबने येथे झालेल्या बेल्जियम आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीचे जेतेपद पटकाविले. खर्रबचे हे आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेतील पहिले जेतेपद आहे. महिलांच्या एकेरीतील अंतिम सामन्यात अनमोल खराबने डेन्मार्कच्या अॅमेली स्कूझचा 24-22, 12-21, 21-10 अशा गेम्समध्ये पराभव करत विजेतेपद पटकाविले. महिला बॅडमिंटनपटूंच्या एकेरीच्या मानांकनात अनमोल खराब सध्या 222 व्या स्थानावर आहे.









